चीनला दणका! सॅमसंग कंपनी भारतात करणार 4825 कोटींची गुंतवणूक

चीनला दणका! सॅमसंग कंपनी भारतात करणार 4825 कोटींची गुंतवणूक

दक्षिण कोरियातली दिग्गज इलेक्टॉनिक्स कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतामध्ये OLED मोबाईल आणि आयटी डिस्प्ले युनिट (Mobile and IT display production unit) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोजेक्टच्या निमित्तानं कंपनी भारतात 4825 कोटींची गुंतवणूक करणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर:  भारत आणि चीन (India- China) या दोन देशांच्या सीमेवर सध्या तणाव आहे. सीमेवरील तणावाचं प्रतिबिंब व्यापारातही उमटलं आहे. दोन्ही देशांमध्ये परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेतली एक मोठी लढाई भारतानं नुकतीच जिंकली आहे.दक्षिण कोरियातली दिग्गज इलेक्टॉनिक्स कंपनी सॅमसंगने (Samsung)  भारतामध्ये OLED मोबाईल आणि आयटी डिस्प्ले युनिट (Mobile and IT display production unit) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोजेक्टच्या निमित्तानं कंपनी भारतात 4825 कोटींची गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट यापूर्वी चीनमध्ये होणार होता. सॅमसंग कंपनीनं चीनमधला प्रस्तावित प्रोजक्ट रद्द करत भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे होणार प्रोजेक्ट?

देशाची राजधानी दिल्ली जवळच असलेल्या नोएडामध्ये हे मोबाईल आणि आयटी डिस्प्ले युनिट प्रोजेक्ट सुरु होणार आहे. या प्रोजेक्टसाठी भारत सरकारच्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स (SPICS) च्या अंतर्गत 460 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

हे वाचा-कोण आहेत राजा चारी? NASA च्या खास मोहिमेसाठी झाली आहे या भारतीयाची निवड

भारत ठरणार जगातील तिसरा देश

भारत आता OLED पद्धतीनं मोबाईल डिस्प्ले तयार करणारा जगातील तिसरा देश ठरणार आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या देशानंतर उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये हा प्रोजेक्ट सुरु होत आहे. सँमसंग कंपनीनं चीनमधील युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत सरकारनं हा प्रोजेक्ट देशात यावा यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न अखेर यशस्वी झाले.

रोजगार निर्मितीला फायदा

सँमसंग कंपनीच्या या प्रोजेक्टमुळे 1,510 लोकांना प्रत्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष लोकांना रोजगार मिळेल, असा दावा उत्तर प्रदेशचे गुंतवणूक मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर संपूर्ण जगात उत्तर प्रदेशला एक वेगळी ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचबररोबर या प्रकल्पासाठी सॅमसंग कंपनीला मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 12, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या