• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Appleने पगार दिला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी iphone च्या कारख्यान्याची केली तोडफोड

Appleने पगार दिला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी iphone च्या कारख्यान्याची केली तोडफोड

कंपनीकडून पगार नाही तर केवळ आश्वासनं पदरात पडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 • Share this:
  बंगळुरू, 12 डिसेंबर : आयफोन कंपनीने तयार केलेल्या आयफोन मोबाईलच्या कारखान्याची कर्मचाऱ्यांनीच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील Apple आयफोन बनवण्याच्या फॅक्टरीत तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे. हा कारखाना कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्रात आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकवण्यात आला होता. अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी विनंती करूनही पगार देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आयफोनच्या कारखान्याची तोडफोड केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना तिथून हटवलं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. हे वाचा-युवराज सिंगच्या वडिलांना भोवलं हिंदूंबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य; सिनेमातून डच्चू मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी काचांची तोडफोड केली तर केबिनमधील सामन अस्ताव्यस्त केलं. हा संपूर्ण प्रकार बराच वेळ सुरू होता. पगार न दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्यांनी कारखान्यात घुसून तुफान गोंधळ घातला आणि तोडफोड केली. तर काही गाड्याही जाळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कंपनीकडून पगार नाही तर केवळ आश्वासनं पदरात पडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनंतर देखील कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नाहीत. वारंवार विनवणी करून देखील पगार न दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कर्मचाऱ्यांना अडवलं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे तर अॅपल कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: