पणजी, 21 मार्च : गोव्याच्या (Goa News) नव्या मुख्यमंत्री निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडे यापुढेही राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच सावंत हे गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हे सर्वांनी मान्य केले. (pramod sawant Goas Chief Minister, This name was confirm in the meeting of BJP MLAs) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आल्याच्या 11 दिवसांनंतर ही बैठक झाली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आज दुपारी येथे दाखल झाले. हे ही वाचा- यूपी, गोवा, उत्तराखंडमध्ये सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक भाजप राज्य विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकली आहे. जे बहुमतासाठी आवश्यक जागांपेक्षा केवळ एक सीटने कमी आहे. भाजपने एमजीपीचे दोन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचं समर्थन मिळवलं आहे. यामुळे नव्या विधानसभेत संख्याबळाच्या बाबतीत आरामदायी स्थिती आहे. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.