मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिर्डीत केवळ ऑनलाईन पासधारकांनाच प्रवेश, दर्शनाला जाण्यापूर्वी सविस्तर वाचा नवे नियम

शिर्डीत केवळ ऑनलाईन पासधारकांनाच प्रवेश, दर्शनाला जाण्यापूर्वी सविस्तर वाचा नवे नियम

शिर्डीतील साईबाबा मंदिरात यापुढे ऑनलाईन (Devotees to get entry only by online pass at Shirdi Sai Temple) पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात यापुढे ऑनलाईन (Devotees to get entry only by online pass at Shirdi Sai Temple) पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात यापुढे ऑनलाईन (Devotees to get entry only by online pass at Shirdi Sai Temple) पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे.

शिर्डी, 5 ऑक्टोबर : शिर्डीतील साईबाबा मंदिरात यापुढे ऑनलाईन (Devotees to get entry only by online pass at Shirdi Sai Temple) पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी (Decision to avoid crowd) हा निर्णय़ घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. साईतील शिर्डी मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आता भक्तांना (Online registration mandatory) ऑनलाईन नोंदणी करावी लागले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक पास जारी करण्यात येईल. हा पास जवळ असेल, तर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

नियमांत बदल

मंगळवारी सकाळीच शिर्डी संस्थान प्रशासनाने दर्शनाची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार पाच हजार भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिले जाणार होते, तर प्रसादालयदेखील सुरू केलं जाणार होतं. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने शिर्डीत बैठक आयोजित केली आणि नियमांत फेरबदल केले. शिर्डीत गर्दी होऊ नये, यासाठी आता साईभक्तांना ऑनलाईन दर्शन आणि आरती पास घेऊनच यावं लागणार आहे.

दहा हजार भाविकांना ऑनलाईन मोफत पास तर पाच हजार भाविकांना ऑनलाईन सशुल्क दर्शन पास मिळणार आहेत. शिर्डीतील रेस्टॉरंट, अत्यावश्यक सेवा आणि लॉजिंग वगळता रात्री 08:30 वाजल्यानंतर सगळे व्यवसीय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

हे वाचा - धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’

असे आहेत नवे नियम

  1. 15 हजार भक्तांना केवळ ऑनलाइन दर्शन पास
  2. शिर्डीत ऑफलाईन पास मिळणार नाही
  3. शिर्डीत येताना ऑनलाइन दर्शन आणि आरती बुकिंग करूनच यावे लागणार
  4. sai.org.in या संस्थानच्या वेबसाईटवर मिळणार ऑनलाईन पास
  5. 10 हजार भाविकांना मोफत तर 5 हजार भाविकांना सशुल्क ऑनलाईन पास मिळणार
  6. साई प्रसादालय राहणार बंद
  7. शिर्डीतील रेस्टॉरंट आणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय रात्री 8.30 नंतर राहणार बंद

First published:
top videos

    Tags: Corona, Online, Shirdi (City/Town/Village)