• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • SANITIZERS चा खप आला निम्म्यावर, Corona कमी होतोय की त्याची दहशत?

SANITIZERS चा खप आला निम्म्यावर, Corona कमी होतोय की त्याची दहशत?

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सर्वसामान्यांनी (Sales of Sanitizers and multivitamins decreased after second wave) कोरोनाला गांभिर्यानं घेणं बंद केल्याची लक्षणं बाजारपेठेत दिसू लागली आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सर्वसामान्यांनी (Sales of Sanitizers and multivitamins decreased after second wave) कोरोनाला गांभिर्यानं घेणं बंद केल्याची लक्षणं बाजारपेठेत दिसू लागली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना ज्या प्रमाणात सॅनिटायजर्स आणि इम्युनिटी बुस्टर्सना मागणी होती, ती (Demand of sanitizer cuts to half) घटून आता निम्म्म्यावर आल्याचं चित्र आहे. खप झाला कमी इंडस्ट्री डाटानुसार मे महिन्यात सॅनिटायजरचा खप होता 77.5 कोटी रुपये. हा आकडा ऑगस्टमध्ये नोंदवला गेला आहे केवळ 47 कोटी रुपये. म्हणजेच हँड सॅनिटायझरचा खप तब्बल 40 टक्क्यांनी घटला आहे. देशभरातील 9 लाख 50 हजार औषध विक्रेत्यांकडून गोळा करण्यात आलेल्या तपशीलांचा आधार घेत ही माहिती गोळा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या मे महिन्यात सॅनिटायजरचा खप तब्बल 400 टक्क्यांनी वाढला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा जेव्हा उद्रेक झाला, तेव्हा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील हँड सॅनिटायझरचा खप हा त्यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत 2400 टक्क्यांनी वाढला होता. व्हिटॅमिन प्रॉडक्टचा खपही कमी सॅनिटायझरप्रमाणे व्हिटॅमिन प्रॉडक्ट्सचा खपही कमी झाला आहे. 2020 साली 185 कोटी मलिव्हिटॅमिनच्या गोळ्या देशभरात विकल्या गेल्या होत्या. हे प्रमाण 2019 च्या तुलनेत 100 टक्के अधिक होतं. 2021 च्या सुरुवातीलाही हा ट्रेंड कायम होता. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर आता खप कमी होत चालला आहे. मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांच्या खपात गेल्या महिन्यात केवळ 5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. हे वाचा - भयावह ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट; या गोष्टी ठरतील कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा लसीकरणाचाही परिणाम लसीकरण वाढल्यामुळेदेखील सॅनिटायझरच आणि मल्टिव्हिटॅमिनचा खप कमी झाल्याचं मानलं जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्यादेखील घटत असल्याचा हा परिणाम आहे. मंगळवारी भारतात 18 हजार 346 नव्या कोरोना केसेसची नोंद झाली आहे. गेल्या 209 दिवसांतला हा सर्वात कमी आकडा आहे.
  Published by:desk news
  First published: