पुणे, 7 जून : महाराष्ट्रातील पुणे येथे चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराबरोबर एक मोठा कट रचला. या विवाहित महिलेने प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी आपल्या सासरीच्या घरात दागिने आणि रोकडसह 1.74 कोटी रुपये चोरले.
या चोरीचं तिने आपल्या प्रियकरासोबत व्यवस्थित प्लानिंग केली होती. यासाठी पहिल्यांदा तिने या प्लानिंगअंतर्गत घराच्या चाव्या मिळवल्या आणि घरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुसर्या बाजूस वळविले. मात्र असं असले तरी सीसीटीव्ही कॅमेर्यानेतून महिलेने गुन्हा केल्याचा खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या महिलेला अटक केली आहे, तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
ही घटना पुण्यातील बिबवेवाडी भागातील आहे. अक्षय दिलीप भंडारी नावाच्या व्यक्तीने घरात दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारीत कुटुंबीयांनी सांगितले की, लोकेश सोसायटीच्या गायत्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर एकमध्ये तो तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. सुमारे चार वर्षांपूर्वी त्याच्या लहान भावाचे मृणाल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. अक्षय हा मसाल्यांचा व्यवसाय करतो. त्यांच्या घरात दागिने आणि रोकड ठेवली.
अक्षयने सांगितले की, मृणालने आपल्या प्रियकर सोबत घरातून दागिने व रोकड चोरुन नेली. सीसीटीव्हीने हा खुलासा झाला आहे. सीसीटीव्हीचा कॅमेरा फिरवताना त्यामध्ये महिलेचा हात दिसत आहे. ती मृणालच होती. कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीने त्याने मृणालचा समजूत घातली आणि पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यांनी छुप्या पद्धतीने मृणालच्या प्रियकराला बोलावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण तो सापडला नाही. मात्र तरीही मृणालच्या कृत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. शेवटी कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार द्यावी लागली.
प्रियकरासह परदेशात जाण्याचा होता प्लान
एसपी कुमार घाडगे म्हणाले की, बुबाने नावाच्या व्यक्तीसोबत महिलेचा 2013 पासून अनैतिकसंबंध सुरू होते. तिच्या संमतीशिवाय कुटुंबीयांनी तिचा विवाह 2016 मध्ये अमरशी लावून दिला होता. मृणालने पोलिसांना सांगितले की ती बुबानेला 2013 पासून ओळखत होती. सासरच्या लोकांकडून अमाप रक्कम चोरल्यानंतर दोघेही देश सोडून परदेशात पळून जाऊन तेथे लग्न करणार होते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही बुबाने याच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या बुबाने याचा शोध घेत आहेत.
हे वाचा-Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thief