Home /News /national /

रक्षकच ठरला भक्षक! मदतीचं सोंग करत हतबल महिलेवर पोलिसाचा 19 दिवस बलात्कार

रक्षकच ठरला भक्षक! मदतीचं सोंग करत हतबल महिलेवर पोलिसाचा 19 दिवस बलात्कार

एका हतबल महिलेला मदतीचं आश्वासन (Pretending to help) देऊन पोलिसानं तिच्यावर 19 दिवस बलात्कार (Police Raped married woman) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    पाली, 05 जून: एका हतबल महिलेला मदतीचं आश्वासन (Pretending to help) देऊन पोलिसानं तिच्यावर 19 दिवस बलात्कार (Police Raped married woman) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका मुलाची आई असून नराधम पोलीस मागील 19 दिवसांपासून तिचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत होता. वेळ मिळताच पीडित विवाहितेनं पोलिसाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आहे. यानंतर तिनं थेट पोलीस स्टेशन गाठत नराधम पोलिसांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पोलिसाच्या मुसक्या आवळ्या असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना राजस्थानातील असून संबंधित आरोपी पोलिसाचं नाव अजयपाल भाकल असं आहे. आरोपी भाकल मागील 19 दिवसांपासून पीडितेचं लैंगिक शोषण करत होता. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या पाली भागात काही महिलांची भांडणं झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपी अजयपाल भाकल संबंधित महिलांची भांडणं सोडवण्यासाठी घटनास्थळी गेले. दरम्यान त्याची ओळख तेथील पीडित महिलेशी झाली. हेही वाचा-शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन घृणास्पद कृत्य भांडण सोडवण्याच्या आणि मदत करण्याच्या बहाण्यानं आरोपी भाकल पीडितेला दहा मिनिटे बाजूला घेऊन गेला. याठिकाणी त्यानं तिला मदतीचं आश्वासन दिलं. हे प्रकरण केवळ एवढ्यावरचं थांबलं नाही, तर आरोपी पोलिसांनं तिला वेळोवेळी मदतीचं आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला आहे. मागील एक 19 दिवसांपासून आरोपी पोलीस पीडितेवर उदयपूर, माऊंट आबू आणि सुमरपूर येथील विविध हॉटेलात नेऊन तिच्यावर अत्याचार करत होता. हेही वाचा-शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन घृणास्पद कृत्य दरम्यान, आरोपी पोलीस अजयपाल भाकल थोड्या वेळासाठू सुमरपूर येथील हॉटेलमधून बाहेर आला. तेव्हा पीडितेनं वेळ साधत हॉटेलमधून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजयपाल विरुद्ध बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी नराधम पोलिसास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Rajasthan, Rape

    पुढील बातम्या