Home /News /maharashtra /

शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तरुणाचं घृणास्पद कृत्य

शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तरुणाचं घृणास्पद कृत्य

Rape in Beed: शेतातील काम उरकून घरी परतणाऱ्या विवाहित महिलेचं अपहरण करून अपहरणकर्त्यानं निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.

    केज, 05 जुलै: शेतातील काम उरकून घरी परतणाऱ्या विवाहित महिलेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित महिलेचं अपहरण करून तिला आपल्या चारचाकी गाडीत जबरदस्तीनं बसवलं आणि तिला एका  निर्मनुष्य ठिकाणी नेलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास नवऱ्याला आणि मुलाला जीवे मारेल, अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडित महिलेनं फिर्याद दाखल करताच पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही संतापजनक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून आरोपी व्यक्तीचं नाव फुलचंद रामभाऊ गायकवाड असं आहे. केज तालुक्यातील घाटेवाडी येथील रहिवासी असणारी पीडित महिला शुक्रवारी (2 जुलै) सायंकाळी शेतातील काम आटोपून आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपी फुलचंद गायकवाड त्याठिकाणी आला. त्यानं एकट्या महिलेला पाहून तिला जबरदस्तीनं आपल्या चारचाकी गाडीत बसवलं. हेही वाचा-पतीला सोडून सासऱ्यासोबत थाटला तरुणीने संसार, RTI टाकल्यानंतर सिक्रेट झालं उघड पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं पीडित विवाहितेचं अपहरण करून तिला शिंदी फाट्यावरील बाळूमामा मंदिरालगत असणाऱ्या एका शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं आरडाओरडा करण्याच्या प्रयत्न केला. पण निर्मनुष्य ठिकाण असल्यानं तिची हाक कोणीचं ऐकली नाही. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं पीडितेला घटनेची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली. तसेच नवरा आणि मुलाला जीवे मारेल, अशी धमकीही दिली. हेही वाचा-प्रेयसीच्या प्रेमासाठी कायपण! बहाद्दरानं मित्राच्या मदतीनं पत्नीला संपवलं घटनेच्या दोन दिवसांनी रविवारी (4 जुलै) पीडित महिलेनं केज पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फुलचंद गायकवाड अटक केली. आरोपी गायकवाडवर पोलिसांनी बलात्कार, अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी देखील जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Kidnapping, Rape

    पुढील बातम्या