गौतम गंभीरने केला महिलेचा अंत्यसंस्कार, 6 वर्षांपासून करत होती घरी काम

गौतम गंभीरने केला महिलेचा अंत्यसंस्कार, 6 वर्षांपासून करत होती घरी काम

गंभीरने एका महिलेवर अखेरचा अंत्यसंस्कार केला, जी मागील 6 वर्षांपासून त्याच्या घरात काम करत होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी देशात कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईदरम्यान मानवतेचे एक उदाहरण सगळ्यांसमोर मांडले आहे. गंभीरने एका महिलेवर अखेरचा अंत्यसंस्कार केला, जी मागील 6 वर्षांपासून त्याच्या घरात काम करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशात राहणारी सरस्वती पात्रा या बराच काळ शुगर व रक्तदाबशी झुंजत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 एप्रिल रोजी उपचार घेत असताना सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला.

तिच्या मृत्यूच्या वेळी गंभीरने ट्विट केले की, 'ती माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्याचे शेवटचे अंत्यसंस्कार करणे माझे कर्तव्य होते. जात, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता नेहमीच प्रत्येकाचा सन्मान ठेवा. माझ्यासाठी एक चांगला समाज तयार करण्याचा हा मार्ग आहे. मला वाटतं हा भारत आहे. ओम शांती.'

गंभीरने कोरोना योद्ध्यांना नमन केले आणि म्हणाले की, गेल्या 30 दिवसात आम्ही दररोज सुमारे 10 हजार लोकांमध्ये रेशन किट आणि भोजन वाटप केले आहे. सुमारे 15 हजार एन N95 मास्क, 4200 पीपीई किट आणि शेल्टर होममध्ये 2000 खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग होण्याचा आकडा 21 हजार 700 वर पोहोचला आहे. या प्राणघातक रोगामुळे आतापर्यंत 686 लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी सगळ्यांना घरात राहणं आणि सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे.

First published: April 24, 2020, 8:05 AM IST

ताज्या बातम्या