मराठी बातम्या /बातम्या /देश /वाल्मिकी जयंतीदिवशीच अरुण वाल्मिकीचा तुरुंगात मृत्यू, कुटुंबाच्या भेटीला जाणाऱ्या प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

वाल्मिकी जयंतीदिवशीच अरुण वाल्मिकीचा तुरुंगात मृत्यू, कुटुंबाच्या भेटीला जाणाऱ्या प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

तुरुंगात मृत्यू झालेल्या अरुण वाल्मिकीच्या कुटंबीयांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव (Police detained Priyanka Gandhi on the way to Agra) प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखलं आहे.

तुरुंगात मृत्यू झालेल्या अरुण वाल्मिकीच्या कुटंबीयांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव (Police detained Priyanka Gandhi on the way to Agra) प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखलं आहे.

तुरुंगात मृत्यू झालेल्या अरुण वाल्मिकीच्या कुटंबीयांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव (Police detained Priyanka Gandhi on the way to Agra) प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखलं आहे.

आग्रा, 20 ऑक्टोबर: – तुरुंगात मृत्यू झालेल्या अरुण वाल्मिकीच्या कुटंबीयांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव (Police detained Priyanka Gandhi on the way to Agra) प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखलं आहे. यावरून प्रियंका गांधी आक्रमक झाल्या असून आपल्याला वाल्मिकीच्या परिवाराची भेट (Death of Arun Valmiki) घेण्यापासून का रोखलं जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अरुण वाल्मिकीचा (Arun Valmiki death on the day of Valmiki birth anniversary) वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच मृत्यू होणं हे दुर्दैवी असून सरकार वाल्मिकींच्या विचारांच्या विरोधात कृती करत असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

प्रियंका गांधींना हायवेवरच थांबवले

पोलीस अटकेत असतानाच अरुण वाल्मिकीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी प्रियंका गांधी दिल्लीहून आग्र्याकडे निघाल्या. मात्र आग्रा एक्सप्रेस हायवेच्या एन्ट्री पॉइंटलाच त्यांना रोखण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधीनी ट्विट करत योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच अरुण वाल्मिकी यांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान महात्मा बुद्धांविषयी भरभरून बोलतात, मात्र प्रत्य़क्षात कृती उलटी करतात. पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या अरुण वाल्मिकींसाठी न्याय मागणं चुकीचं आहे काय, असा सवाल प्रियंका गांधींनी केला आहे. दरवेळी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातो, असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचा- लग्नाच्या इतक्या वर्षांनी मिळाली Good News; 70 वर्षीय महिलेनं दिला बाळाला जन्म

पोलिसांनीच मारल्याचा आरोप

अरुण वाल्मिकीला पोलिसांनी मारल्यामुळेच त्याने तुरुंगात प्राण सोडले, असा आरोप प्रियंका गांधींनी केला आहे. आपण कुठेही जाताना प्रत्येकवेळी सरकारची परवानगी घ्यायची का, असा सवाल त्यांनी केला आहे. सरकार सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असून विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी केला. मात्र आपण वाल्मिकीच्या कुटुंबीयांच्या बाजूने आवाज उठवत राहणार असून न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Priyanaka gandhi, Uttar pardesh