मराठी बातम्या /बातम्या /देश /चमत्कारच! लग्नानंतर कित्येक वर्षांनी मिळाली Good News; 70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म

चमत्कारच! लग्नानंतर कित्येक वर्षांनी मिळाली Good News; 70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म

जीवूबेन आणि त्यांचे पती मालधारी (वय 75) हे मुलाला जन्म दिल्यापासून चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने पत्रकारांना दाखवलं.

जीवूबेन आणि त्यांचे पती मालधारी (वय 75) हे मुलाला जन्म दिल्यापासून चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने पत्रकारांना दाखवलं.

जीवूबेन आणि त्यांचे पती मालधारी (वय 75) हे मुलाला जन्म दिल्यापासून चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने पत्रकारांना दाखवलं.

अहमदाबाद, 20 ऑक्टोबर : कोणत्याही महिलेसाठी आई होणं हा एक विशेष अनुभव असतो. पण वयाच्या 70 व्या वर्षी जर एखादी स्त्री आई बनली तर तुम्ही त्याला काय म्हणाल? गुजरातच्या कच्छमध्येही असेच घडले आहे. 70 वर्षीय (70 years age woman gives birth) जीवूबेन रबारी यांनी लग्नाच्या 45 वर्षानंतर एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म देणाऱ्या त्या जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचा दावा जिवूबेन यांनी स्वत: केलाय.

आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिला

जीवूबेन आणि त्यांचे पती मालधारी (वय 75) हे मुलाला जन्म दिल्यापासून चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दोघांनीही आपल्या मुलाला अभिमानाने पत्रकारांना दाखवलं. या जोडप्याला हे मूल आयव्हीएफ तंत्राद्वारे मिळाले. दोघेही कच्छमधील मोरा या छोट्या गावाचे रहिवासी आहेत. मुलाच्या जन्मापासून त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आई आणि मूल दोघेही पूर्णपणे ठणठणीत आहेत.

हे वाचा - ऐन सणासुदीला भाजीपाल्याबरोबर कांदाही रडवणार! महिन्याभरात दुप्पट झाले भाव

या वयात आई होण्याच्या अडचणींविषयी डॉक्टरांचा इशारा

जीवूबेन आणि मालधारी यांचा 45 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांनंतर अपूर्ण राहिली. डॉ.नरेश भानुशाली यांनी जोडप्याला स्पष्टपणे सांगितले होते की, म्हातारपण आणि काही अडचणींमुळे मुलाला जन्म देणे कठीण होईल, पण या जोडप्याने देवावर विश्वास ठेवला आणि हे अशक्य आणि कठीण काम शक्य झालं.

हे वाचा - पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार; चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने 2 वर्षे अत्याचार

जीवूबेन जगातील सर्वात वृद्ध आई?

एखाद्या मुलाला जन्म देणाऱ्या त्या सर्वात वयोवृद्ध महिला असल्याचा जीवूबेन यांचा दावा अद्याप सिद्ध झालेला नाही. 2009 मध्ये यूकेच्या एलिझाबेथ अदिनीने जगातील सर्वात वृद्ध आई होण्याचा विक्रम केला होता. त्याही मुलाचा जन्म IVF तंत्राने झाला होता. खरं तर, यूकेमध्ये 50 वर्षांवरील महिलांसाठी आयव्हीएफ सुविधा उपलब्ध नाही, यासाठी एलिझाबेथला युक्रेनला जावे लागले होते.

First published:
top videos

    Tags: Pregnancy, Pregnant woman