लखनऊ 23 सप्टेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या 21 सप्टेंबर रोजी कैलादेवी येथे झालेल्या सभेनंतर समाजवादी पक्षाचे युवा नेते भावेश यादव यांच्या नेतृत्वाखाली त्या जागेवर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी भावेश यादव (Bhavesh Yadav) यांना अटक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे कैलादेवी (Kailadevi) इथली भूमी अशुद्ध झाली आहे, असं भावेश यादव यांनी म्हटलं होतं. तसंच, त्यानंतर त्यांनी त्या सभेच्या स्थळाचं शुद्धीकरण होण्यासाठी तिथे गंगाजल शिंपडलं होतं. मंगळवारी (21 सप्टेंबर) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा संपल्यानंतर समाजवादी (Samajwadi Party) युवजन सभेचे प्रदेश सचिव भावेश यादव आपले समर्थक आणि कार्यकर्त्यांसह कैलादेवी येथे पोहोचले. त्यांनी हेलिपॅडपासून सभास्थळापर्यंतच्या क्षेत्रावर गंगाजल शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण केल्याचा दावा केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देवी-देवता, तसंच जातीच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोपही भावेश यांनी केला. मनसुख मांडवीय करणार ‘आरोग्य मंथन 3.0’चं उद्घाटन; 3 दिवस चालणार कार्यक्रम ‘मुख्यमंत्र्यांनी मां कैलादेवीचं दर्शन घेतलं नाही. त्यामुळे कैलादेवीचा अपमान झाला आहे. भाजप देवी-देवतांमध्येही भेदभाव करतो आहे. सच्च्या व्यक्ती कधी भेदभाव करत नाहीत. भाजपने मात्र मागास, दलित आणि अल्पसंख्याकांचा छळ आणि विश्वासघात केला आहे,’ असं भावेश यादव म्हणल्याचं ‘दैनिक जागरण’च्या वृत्तात म्हटलं आहे. भाजपने नोकऱ्या देण्यातही पक्षपात केला असल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित शुद्धीकरणाचे फोटो, व्हिडिओही समाजवादी पक्षाकडून व्हायरल करण्यात आल्याचं ‘लाइव्ह हिंदुस्तान’च्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या संदर्भात बहजोई पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्या आधारे भारतीय दंडविधान कलम 153 ए, 253 ए आणि 505 अंतर्गत पोलिसांनी भावेश यादव यांच्यासह अन्य 8 ते 10 अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश यादव यांना अटक केली. धार्मिक आणि सांप्रदायिक विषयांवरून नागरिकांमध्ये क्षोभ पसरवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 3 दिवसीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी; असा असेल कार्यक्रम त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असं लिहिण्यात आलं होतं, की मुख्यमंत्र्यांच्या नागरी सभेनंतर गंगाजल शिंपडून सभास्थळ शुद्ध करण्याच्या यादव यांच्या दाव्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये रोष निर्माण झाला असून समाजाची शांतता भंग होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.