• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय करणार ‘आरोग्य मंथन 3.0’चं उद्घाटन; 3 दिवस चालणार कार्यक्रम

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय करणार ‘आरोग्य मंथन 3.0’चं उद्घाटन; 3 दिवस चालणार कार्यक्रम

आयुष्मान भारत (AB PM-JAY) योजनेने तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंथन 3.0 या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 23 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली होती. या योजनेचा आज (23 सप्टेंबर 2021) तिसरा वर्धापनदिन आहे. 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुष्मान भारत दिवस (Ayushman Bharat Divas) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने या वर्षी 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ‘आरोग्य मंथन 3.0’ (Arogya Manthan 3.0) या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाचं (Online and Offline programme) आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानही ते भूषवतील, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (National Health Authority NHA) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. एएनआय न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप 27 सप्टेंबर 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ चं (PM-DHM) लोकार्पण करून होईल. 3 दिवसीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी; असा असेल कार्यक्रम आयुष्मान भारत (AB PM-JAY) योजनेने तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंथन 3.0 या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा, सदस्य डॉ. विनोद के. पॉल, आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण, एनएचएचे अतिरिक्त सीईओ प्रवीण गेडाम, एनएचएचे डेप्युटी सीईओ डॉ. विपुल अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असंही या पत्रकात म्हटलं आहे. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींशी (Beneficiary) मांडवीय यावेळी संवाद साधणार आहेत. मांडवीय यांच्या हस्ते एनएचएच्या वार्षिक अहवाल 2020-2021 चं प्रकाशनही केलं जाणार आहे. देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत (States and Union Territories) सरकारची आयुष्मान भारत ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी मांडवीय यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवरण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉस्पिटल हेल्प डेस्क किऑस्क, लाभार्थी गौरव एजन्सी, पीएम-जय कमांड सेंटर, नज युनिट आणि पीएम-जयचा सुधारित टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म यासारख्या सरकारच्या विशेष उपक्रमांचं उद्घाटनही केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय करतील. या उपक्रमांमुळे आयुष्मान भारत अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेणं लाभार्थींना सोयीचं होणार आहे. जागतिक हेल्थ कव्हरेज देण्याच्या उद्देशाने 23 सप्टेंबर 2018 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांचीमध्ये आयुष्मान भारत ही योजना सुरू केली होती, असंही या पत्रकात म्हटलं आहे. दिल्लीच्या भारत दर्शन पार्क' मधून हेरिटेजचा इतिहास मिळणार अनुभवायला! आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 10.74 कोटी गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील सुमारे 54 कोटी लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आता देशातील 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत ही योजना सुरू आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सरकारने मान्यता दिलेल्या 24 हजार सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून 26 हजार 400 कोटी रुपये खर्चून 2 कोटींहून अधिक ट्रिटमेंटना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत 918 हेल्थ बेनिफिट पॅकेजेसच्याअंतर्गत कोविड-19 च्या ट्रिटमेंटसह 1669 प्रोसिजर्स कव्हर केल्या जातात. तसंच Orthopaedics, Cardiology, Cardio Thoracic, vascular surgery, Radiation Oncology, Urology या विषयांतील उपचारही या योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे ‘आप के द्वार आयुष्यमान’ हे अभियान गेल्यावर्षी सुरू करण्यात आलं असून सरकारी नोडल एजन्सी ही योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या अभियानातून या योजनेबद्दल जनजागृती केली जात आहे. ग्रामीण भागात दारोदार जाऊन 3 कोटी लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन या अभियानातून करण्यात आलं आहे. ‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या कारण गेल्या तीन वर्षांत सुमारे 16.50 कोटी लाभार्थींचे दावे पडताळून त्यांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आली असून त्यामध्ये 50 टक्के महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत देशभरात या योजनेअंतर्गत 2.6 लाख जणांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेतले असून त्यासाठी 585 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर Universal Healthcare Coverage Reforms and Challenges या विषयावर एक टेक्निकल सेशन होणार आहे. 24 सप्टेंबरला या कार्यक्रमाअंतर्गत 'Strengthening Public Healthcare Leveraging PM-JAY and Reforms in Provider Payment Mechanism: Opportunities for AB PM-JAY' या विषयावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या कल्पना मांडणार आहेत. 25 सप्टेंबरला चौथ्या टेक्निकल सेशनमध्ये 'Health Insurance Penetration to Cover the Missing Middle through Convergence of National Schemes' या विषयावर चर्चा होणार असून, त्यानंतर 'Health Care through Digital Transformation' या विषयावर तज्ज्ञ मंडळी चर्चा करतील. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, कॉर्पोरेट जगतातील अधिकारी, थिंक टँक, हॉस्पिटल आणि माध्यमांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन तांत्रिक विषयांवर चर्चा करावी आणि आयुष्यमान भारत योजनेचं यश साजरं करावं अशी कल्पना या आयोजनामागे आहे असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. आरोग्य मंथन 3.0 या व्यासपीठाच्या माध्यमातून एनएचएला आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व भागीदारांना एकत्र आणून पुढील वाटचालीबाबत त्यांचे अनुभव, विचार मांडण्याची संधी द्यायची आहे असंही या पत्रकात म्हटलं आहे.
First published: