हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आग्रा, 3 जुलै : पावसाळा सुरू झाला की बिळांमध्ये दडून बसलेल्या प्राण्यांच्या बाहेर येण्याला जणू उधाण येतं. जंगलांशेजारी, नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सापांपासून, बेडकांपासून, उंदरांपासून, मगरीपासून आणि विषारी विंचवांपासून जपून राहावं लागतं. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात तर चक्क पोलिसांनाच विंचवांनी हैराण केलं आहे. दररोज जवळपास 8-10 विंचवांशी त्यांना सामना करावा लागतोय. आग्रा शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिनाहटच्या मनसुखपुरा पोलीस स्थानकात आजकाल दररोज पोलिसांच्या वर्दीत, बुटांमध्ये विंचू आढळतात. विंचवांनी पोलिसांची झोपच उडवली आहे. चक्क दोन होमगार्डना केवळ विंचू पकडण्याचं काम देण्यात आलंय.
प्रथमोपचारांसाठी फार लांब जावं लागतं. या पोलीस स्थानकाच्या आजूबाजूला जंगल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जंगलातून मोठ्या प्रमाणावर विंचू बाहेर पडतात. हे विंचू प्रचंड विषारी असतात. त्यामुळे पोलिसांना त्यांची वर्दी, बूट पूर्णपणे तपासूनच घालावे लागतात. शिवाय रात्रीची ड्युटी असल्यास जरा जरी डोळा लागला की विंचू चटकन डसतात. महत्त्वाचं म्हणजे या गावात दवाखाना नाही. त्यामुळे विंचू चावल्यास प्रथमोपचारांसाठी फार लांब जावं लागतं. गावातील लोक तर घरगुती उपचारच करतात, मात्र ते त्यांच्या जीवावरही बेततं. Shiv Thakare: ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर शिव ठाकरे जखमी; स्टंट करताना अशी झाली दुखापत परिणामी या विंचवांपासून वाचण्यासाठी पोलीस 24 तास तयारीत राहतात. चिमटा, बॅटरी आणि एक मडकं सोबत बाळगतात. विंचू दिसला की त्याला चिमट्याच्या साहाय्याने उचलून मडक्यात टाकतात. दिवसाअखेर मडक्यात जमलेले सर्व विंचू जंगलात सोडून दिले जातात. दरम्यान, हा त्रास केवळ यावर्षीचा नाही, तर दरवर्षी पावसाळ्यात या स्थानकातील पोलिसांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यांना चोरांसह विचवांनाही पकडावं लागतं.