मुंबई, 07 जून : देशभरात कोरोनाबाधित (Corona cases) रुग्णांची संख्या वाढत आहे तर कुठे आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) आज जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास जनतेशी संवाद साधणार आहे. या वेळी कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि सोशल मीडियाबद्दल काही बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Prime Minister Shri @narendramodi will address the nation at 5 PM today, 7th June.
— PMO India (@PMOIndia) June 7, 2021
गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना भारतातील कायदे पाळण्याची तंबी दिली होती. पण, ट्वीटरने यास नकार दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आज काय बोलणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांना 'शहीद'चा दर्जा देणाऱ्या हरभजन सिंगवर कारवाईची मागणी
दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून थोडे अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर 2427 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी दिवसभरात 1 लाख 74 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर 61 दिवसांनंतर रविवारी एवढे कमी नवे रुग्ण देशात आढळून आले आहे.
देशात लसीकरण जोरात
देशात आतापर्यंत 23 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. 23,27,86,482 लोकांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी रविवारी 13,90,916 लोकांचं लसीकरण झालं. ICMR नुसार, रविवारी देशात 15,87,589 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत 36,63,34,111 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.