जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / खलिस्तानी दहशतवाद्यांना 'शहीद'चा दर्जा देणाऱ्या हरभजन सिंगवर कारवाईची मागणी

खलिस्तानी दहशतवाद्यांना 'शहीद'चा दर्जा देणाऱ्या हरभजन सिंगवर कारवाईची मागणी

खलिस्तानी दहशतवाद्यांना 'शहीद'चा दर्जा देणाऱ्या हरभजन सिंगवर कारवाईची मागणी

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सनला (Ollie Robinson) वर्णद्वेषी ट्विट प्रकरणात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) निलंबित केले आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून: इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सनला (Ollie Robinson) वर्णद्वेषी ट्विट प्रकरणात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) निलंबित केले आहे. रॉबिन्सननं आठ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. क्रिकेट विश्वात हे प्रकरण गाजत असतानाच टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आला आहे. हरभजननं अमृतसरमधील सुवर्ण मंदीरात (Golden Temple Amritsar) ऑपरेशन ब्लू स्टारच्या (Operation Blue Star) कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या कारवाईला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं हरभजननं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये हरभजननं एक फोटो अपलोड केला असून त्यात खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावालेचा (Jarnail Singh Bhindranwale) फोटो आहे. हरभजनं या पोस्टमध्ये या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना ‘शहीद’चा दर्जा देत प्रणाम केला होता.

News18

हरभजननं काही वेळानं ही पोस्ट काढून टाकली. मात्र त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला आहे. या पोस्टमधील फोटोवर पंजाबीमध्ये मजकूर आहे. “स्वाभिमानाने जगणे आणि धर्मासाठी मरणे. 1 ते 6 जून 1984 या कालावधीमध्ये सचखंड श्री हरमंदिर सिंह साहबमध्ये झालेल्या हत्याकांडात शहीद झालेल्या सर्वांना कोटी कोटी नमन.’’ हरभजन सिंगनं या पोस्टवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या पोस्टबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

News18

News18

Sagar Dhankar Murder: सुशील कुमार जेलमध्ये अर्धपोटी, विशेष खुराकची मागणी हरभजन सिंग गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. आयपीएल सिझन 14 मध्ये (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सदस्य आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी तो केकेआरकडून 3 मॅच खेळला. यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. हरभजनने आयपीएल कारकिर्दीमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य होता. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमधून (IPL 2020) हरभजनने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात