जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान मोदी यांनाही मिठाईची भुरळ; या मिठाईची चवच न्यारी, पाहा VIDEO

पंतप्रधान मोदी यांनाही मिठाईची भुरळ; या मिठाईची चवच न्यारी, पाहा VIDEO

वाराणसी स्पेशल स्टोरी

वाराणसी स्पेशल स्टोरी

वाराणसीच्या लौंगलता या मिठाईची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.

  • -MIN READ Local18 Varanasi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी, 25 मार्च : बनारस हे त्याच्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील मिठाईचे शौकीन लोक सर्वत्र पाहायला मिळतात. यातील अशीच एक बनारसी मिठाई म्हणजे ‘लौंगलता’. या मिठाईची चव उत्कृष्ट असून सध्या सर्वत्र तिची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी वाराणसीत आले असता त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मंचावरून या बनारसी लौंगलता मिठाईचा उल्लेख केला. या मिठाईची विशेषत: काय आहे, हे जाणून घेऊयात. वाराणसीमध्ये पीएम मोदी म्हणाले, “जेव्हा लोक वाराणसी येथे भेट देतात तेव्हा ते इथे जिलेबीसोबत लौंगलता मिठाचाही आस्वाद घेतात. त्यामुळे येथील लोकांचा व्यवसाय वाढला असून त्यांचे उत्पन्नाचे नवे स्रोत उघडले आहेत. पीएम मोदींचा हा संवाद वाराणसीमधील ज्या लोकांनी ऐकला, त्यांना त्यांच्या चवीचा अभिमान वाटला. तसेच ज्यांना या मिठाईची माहिती नाही, ते सोशल मीडिया आणि इंटरनेटवर या मिठाईची माहिती घेताना दिसत आहे. चव आहे अप्रतिम - बनारसचे रहिवासी आशिष कुमार यांनी सांगितले की, लौंगलता या मिठाईची चव अप्रतिम आहे. प्रत्येकाला ही देशी मिठाईची चव आवडते. तसेच या मिठाईमुळे आरोग्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही. वाराणसीच्या प्रत्येक चौकाचौकात ही देशी मिठाई सहज मिळते.

लौंगलता या मिठाई हे कशी तयार करतात, याबाबत दिनेश यादव यांनी सांगितले की, मैदा, खोवा, लवंग, वेलची आणि ड्रायफ्रुट्सपासून लौंगलता बनवतात. सर्वप्रथम खवा, लवंगा, वेलची आणि सुका मेवा तळून मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर ते मैदाच्या पोळीमध्ये भरले जाते. नंतर कढईत तळल्यानंतर ते साखरेच्या पाकात बुडवले जाते. अशा प्रकारे लौंगलता मिठाई तयार करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात