छकुल्याला वाचवण्यासाठी बाबाची धडपड! 15 हजार कमवणाऱ्या बापानं 3 वर्षांत जमवले 1 कोटी 70 लाख रुपये

छकुल्याला वाचवण्यासाठी बाबाची धडपड! 15 हजार कमवणाऱ्या बापानं 3 वर्षांत जमवले 1 कोटी 70 लाख रुपये

आपल्या चिमुकल्याच्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार व्हावेत, यासाठी एका बापानं काय काय केलं नाही. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारी ही बापलेकाच्या संघर्षाची कहाणी.

  • Share this:

भोपाळ, 26 डिसेंबर :  प्रत्येक मूल (child) आपल्या आईबाबाच्या काळजाचा तुकडा असतो. पण सहसा नेहमी आईचं प्रेम, आईची माया, आईची धडपडच दाखवली जाते. पण खरंतरं आईच्या प्रेमाप्रमाणे आपल्यामागे अप्रत्यक्षपणे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या बापामुळेच (father) आपण कितीतरी संकटं पार करत असतो. मध्य प्रदेशमधील (madhya pradesh) अशाच एका बापाची धडपड. एका गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या छकुल्याला वाचवणाऱ्या बाबाचा संघर्ष. आपल्या मुलाला जगवण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस एक करून, मेहनत करून त्यानं पै-पै जमवलेत आणि आता त्याच्या डोळ्यात आपल्या मुलाच्या उपचाराची प्रतीक्षा त्याला आहे.

ही गोष्ट आहे एका सहा वर्षांचा प्रियांशू आणि त्याच्या उपचारासाठी अथक परिश्रम करून पैसे जमा करणारे त्याचे वडील सागर मेश्राम यांची . प्रियांशु हा आपल्या वडीलांच्या प्रेमाच्या आधारे गेल्या सहा वर्षांपासून एका दुर्धर आजाराशी संघर्ष करतो आहे. सागर हे पिझ्झा डिलिव्हरीचे (Pizza Dilivary) काम करतात. त्यांना महिन्याला केवळ 15 हजार रुपये पगार मिळतो. या उत्पन्नाच्या आधारे गेल्या तीन वर्षे 8 महिने ते मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवत होते. अखेरीस इलाजासाठी लागणारी 1 कोटी 70 लाखांची रक्कम जमा करण्यात त्यांना यश आलं. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या लहानग्यावर आता अमेरिकेतील (America) बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये (Boston Chidern Hospital) उपचार करण्यात येणार असून हे कुटुंब येत्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेला रवाना होईल.

भोपाळमधील  (Bhopal) भदभदा परिसरात सागर मेश्राम राहत होते. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांचा मुलगा म्हणजे प्रियांशूचा जन्म झाल्यावर आयुष्यात आणखी काय पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात होती. प्रियांशू चार महिन्यांचा असताना एक दिवस अचानक त्याची तब्येत बिघडली. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला डबल आऊटलेट राईट वेन्ट्रिकल विथ लार्ज मस्क्युलर वेन्ट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट हा आजार आहे. त्यामुळे या मुलाच्या हदयात एक मोठा छेद होता. यामुळे हद्यातील रक्त मोठ्या वेगाने थेट फुप्फुसात जात होते.

हे वाचा - वयाच्या चाळीशीतच तिनं जग सोडलं; पण जाता जाता चौघांना नवं आयुष्य दिलं

त्यानंतर यावर इलाजासाठी या मुलास दिल्लीतील एम्स (AIIMs) रुग्णालयात नेण्यात आलं. पण तेथील डॉक्टरांनी सांगितलं की याची शस्त्रक्रिया ही मुलाच्या जन्मानंतर एक ते दोन आठवड्यात होणं आवश्यक होतं. त्यामुळे ती आता शक्य नाही. त्यानंतर डॉक्टरांनी दिल्लीतील फोर्टीस (Fortis) रुग्णालयातील डॉ. के.एस.अय्यर यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. डॉ. अय्यर यांनी तीन शस्त्रक्रिया कराव्या लागतील आणि त्यानंतरही प्रियांशु 10 पेक्षा जास्त वर्षे जगू शकणार नाही, असे सांगितले.

राष्ट्रीय बाल स्वाथ्य अभियानातून मिळालेल्या एक लाख रुपायांतून 13 जानेवारी 2015 ला पहिली शस्त्रक्रिया पार पडली. दुसरी शस्त्रक्रिया दोन वर्षांनी करायची होती. मुंबईत राहणे परवडणारे नसल्याने मुलगा व पत्नीसह पुण्यात येऊन पिझ्झा डिलेव्हरीचे काम सुरु केल्याचे सागर मेश्राम सांगतात. दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा करताना भोपाळ येथील घर विकून टाकले. जानेवारी 2016 मध्ये दिल्लीला शस्त्रक्रियेसाठी गेलो असता, डॉक्टरांनी आता उशीर झाला आहे, दुसरी शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे सागर सांगितले. त्यामुळे मिळेल तेवढा वेळ मुलासोबत घालवावा असा सल्लाही दिला.

हे वाचा - Rajinikanth Health Update: रजनीकांत यांची प्रकृती स्थिर, इतक्यात डिस्चार्ज नाहीच

मुंबई, बेंगळुरु, हैद्राबाद येथील मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये सागर गेले. पण त्यांनी हिंमत सोडली नाही. सोशल मीडीयावर आपल्या मुलाच्या आजाराविषयी पोस्ट टाकली. या आजाराची माहिती देणारे व्हिडीओ पाहिले, यातूनच अमेरिकेतील बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतात, असे त्यांना समजले. त्यानंतर या हॉस्पिटलला मेल पाठवला त्यांनी 50 हजार भरण्यास सांगितले. परंतु एवढे पैसे सागर यांच्याकडे नव्हते. मग त्यांनी त्यांची कहाणी हॉस्पिटलला मेल केली. त्यानंतर या आजारावर उपचार शक्य आहेत परंतु, 65 हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात आले. जो नंतर वाढून 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोहोचला.

सागर यांनी दिवसरात्र एक करून पै-पै जमा केले. तसेच नोकरीनंतर मिळालेल्या वेळात त्यांनी रस्त्यावर उतरुन मुलाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मुलाच्या आजाराची माहिती दिली आणि मदत मागितली.  त्यांनी मदतीसाठी सोशल मिडीयावरही (Social Media) पोस्ट टाकली.सागरचा संघर्ष पाहून देशाविदेशातील लोक मदतीसाठी धावून आले आणि आर्थिक मदत देऊ केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Chief Minister Shivrajsingh Chohan) सरकारकडून उपचारांसाठी जाण्याकरिता खर्च मिळावा, अशी प्रियांशुच्या परिवाराची अपेक्षा आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ देखील मागितली आहे.

Published by: Priya Lad
First published: December 26, 2020, 8:20 PM IST

ताज्या बातम्या