Home /News /national /

रात्री 1.13 ला बनारस स्टेशनवर दिसले पंतप्रधान, मध्यरात्री वाराणसीच्या रस्त्यांवर फिरत घेतला विकासकामांचा आढावा

रात्री 1.13 ला बनारस स्टेशनवर दिसले पंतप्रधान, मध्यरात्री वाराणसीच्या रस्त्यांवर फिरत घेतला विकासकामांचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या दोन दिवसीय वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अनेक महत्त्वाचे कार्यक्रम प्रस्तावित आहेत.

    उत्तर प्रदेश, 14 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या दोन दिवसीय वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अनेक महत्त्वाचे कार्यक्रम प्रस्तावित आहेत. मात्र त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वाराणसीच्या विकासकामांची पाहणी केली आणि पवित्र नगरीसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. पीएम मोदींनी मंगळवारी मध्यरात्री 12.52 वाजता ट्विट केलं, ज्यात त्यांनी लिहिलं, काशीमधील विकासकामांची पाहणी करत आहे. या पवित्र नगरीसाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मध्यरात्री काशीची विकासकामे पाहण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधला. असा असेल मंगळवारचा दौरा पंतप्रधान आज सकाळी 9 वाजता (Conclave with BJP CMs)अनेक भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला 9 उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. यानंतर, संध्याकाळी सर्ववेद मंदिराच्या सद्गुरू सफालदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिनाच्या उत्सवात पंतप्रधान सहभागी होतील. पीएम मोदी विहंगम योगाचे मोठे केंद्र असलेल्या सर्ववेद महामंदिर धामलाही भेट देऊ शकतात. संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान वाराणसी विमानतळावरून नवी दिल्लीला रवाना होतील. पंतप्रधान मोदींनी सोमवारी काशीमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठकही घेतली. या बैठकीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा उपस्थित होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुमारे 6 तास चालल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: PM narendra modi, Uttar pradesh news

    पुढील बातम्या