Home /News /national /

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार?, जो बायडेन यांची होणार पहिल्यांदा भेट

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार?, जो बायडेन यांची होणार पहिल्यांदा भेट

या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US tour) जाण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US tour) जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता झालेली नाही. वृत्तसंस्था ANIनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याची तयारी सध्या सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं की, वेळापत्रक अद्याप निश्चित झालं नाही. सुरुवातीच्या वृत्तानुसार असा अंदाज लावण्यात येत आहे की, पंतप्रधान मोदी 23-24 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. 2019 ला मोदी शेवटचे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान, त्यांनी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्यूस्टनमध्ये परदेशी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केलं होतं. बांगलादेशचा न्यूझीलंडवर पुन्हा विजय, ऑस्ट्रेलियाला बसला मोठा फटका पंतप्रधान मोदींची यावेळचा अमेरिका दौरा अशा वेळी होणार आहे जेव्हा अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी आल्यानंतर तालिबानशी संबंधांबाबत अनिश्चितता आहे. तसंच यावेळच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली वैयक्तिक भेट असेल. वॉशिंग्टनच्या दौऱ्यानंतर पीएम मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) उच्चस्तरीय वार्षिक सभेला उपस्थित राहणार आहेत. तसंच पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबर रोजी या उच्चस्तरीय वार्षिक अधिवेशनाला संबोधित करण्याची शक्यता आहे. भारत देश संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा एक अस्थायी सदस्य आहे आणि अलीकडेच भारताचे एक महिन्याचे अध्यक्षपद संपलं आहे. तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर राजकीय संकटाला सामोरे जाणारा अफगाणिस्तान हा यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: America, Narendra modi

    पुढील बातम्या