नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची जगातील सर्वात आवडता नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. अप्रूवल रेटिंगच्या ( Approval Rating)बाबतीत जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनाही मागे टाकलं आहे. अहवालानुसार, पीएम मोदींची अप्रूवल रेटिंग 70 टक्के आहे आणि हे रेटिंग जगातील पहिल्या 13 नेत्यांमध्ये सर्वाधिक आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदी इतर जागतिक नेत्यांपेक्षा चांगले काम करत आहेत. पीएम मोदी वगळता केवळ दोन जागतिक नेत्यांना 60 पेक्षा जास्त रेटिंग मिळालं आहे. या यादीमध्ये पंतप्रधान मोदींनंतर दुसरा क्रमांक मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा आहे. ज्यांची अप्रूवल रेटिंग 64 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर इटालियन पंतप्रधान मारिओ द्रागी आहेत ज्यांचे रेटिंग 63 आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल 52 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या अप्रूवल रेटिंगच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. बायडेन यांची अप्रूवल रेटिंग 50 पेक्षा कमी आहे. त्यांची रेटिंग 48 आहे.
धक्कादायक! काँग्रेस आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल; 6 वर्षांपूर्वी झाला होता वहिनीचा मर्डर
मे महिन्याच्या सुरुवातीला 2020 मध्ये पंतप्रधान मोदींची अप्रूवल रेटिंग 84 टक्के होती. त्यावेळी भारत कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत होता. मॉर्निंग कन्सल्ट अप्रूवल रेटिंग यादी नरेंद्र मोदी- 70% लोपे ओब्रॅडर- 64% मारियो द्राघी- 63% एंजेला मार्केल- 53% जो बायडेन- 48% स्कॉट मॉरिसन- 48% जस्टिन ट्रूडो- 45% बोरिस जॉनसन- 41% जेर बोल्सोनॅरो- 39% मून जे-इन- 38% पेड्रो सांचेज- 35% इमॅनुएल मॅक्रों- 34% योशिहिदे सुगा- 25% मॉर्निंग कन्सल्ट ही एक राजकीय गुप्तचर संस्था आहे. ही संस्था सद्यस्थितीत ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेत्यांचे कामकाज, त्यांच्याद्वारे जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयांसह त्यांच्यासाठी अप्रूवल रेटिंगचं निरीक्षण करते.