मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! काँग्रेस आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल; 6 वर्षांपूर्वी झाला होता वहिनीचा मर्डर

धक्कादायक! काँग्रेस आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल; 6 वर्षांपूर्वी झाला होता वहिनीचा मर्डर

काँग्रेसचे आमदार बैजनाथ कुशवाह (congress MLA Baijnath Kushwaha) आणि त्यांच्या कुटुंबातील इतर 6 सदस्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबळगढ न्यायालयानं त्यांचा धाकटा भाऊ हरीसिंह कुशवाह यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

ग्वाल्हेर, 04 सप्टेंबर : अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष (congress party MLA) आधीच बिकट स्थितीत असताना एका काँग्रेसच्या आमदारावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. काँग्रेसचे आमदार बैजनाथ कुशवाह (congress MLA Baijnath Kushwaha) आणि त्यांच्या कुटुंबातील इतर 6 सदस्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबळगढ न्यायालयानं त्यांचा भाऊ हरीसिंह कुशवाह यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयानं सर्वांविरुद्ध वॉरंट काढलं आहे.

मध्यप्रदेशच्या सबळगड विधानसभा मतदारसंघाचे बैजनाथ कुशवाह प्रतिनिधित्व करतात. सबळगड न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राकेश कुमार गोयल यांनी याप्रकरणी निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आमदार बैजनाथ कुशवाह यांचे धाकटे बंधू हरिसिंग कुशवाह यांची पत्नी अंगुरी कुशवाह यांचा मृतदेह 2015 मध्ये शेतात सापडला होता. आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर सबळगढमध्ये राहणारे अंगुरीचे भाऊ गोरेलाल कुशवाह यांनी या प्रकरणी सबळगढ न्यायालयात बैजनाथ कुशवाह आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले होते की, तिच्या बहिणीची हत्या तिच्या सासरच्या लोकांनी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रार पत्रात आमदार बैजनाथ कुशवाह, आमदारांचे मोठे बंधू बिशनलाल कुशवाह, लक्ष्मीनारायण कुशवाह, लहान भाऊ लखन सिंह कुशवाह यांच्यासह बवनसिंह, मुलगा केदारसिंह, वहिनी त्रिवेणी, लखन सिंह कुशवाह आणि वीरू कुशवाह यांना आरोपी केले आहे.

हे वाचा - स्वत:चं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 8 सप्टेंबरला ही बँक विकतेय स्वस्त प्रॉपर्टी; कशी कराल खरेदी?

चारित्र्याच्या संशयावरून तिच्या बहिणीला तिच्या सासरच्यांनी हत्या केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वी या प्रकरणात हरिसिंग कुशवाह यांचे नाव होते, परंतु सबळगढ न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुटुंबातील उर्वरित सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अंगुरीच्या हत्येसाठी सर्व सदस्यांना दोषी मानून न्यायालयाने कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवून या सर्वांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार बैजनाथ कुशवाह आणि या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना 8 ऑक्टोबर रोजी सबळगड न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

First published:

Tags: Congress, Crime news, Mla