नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला संबोधित केलं आहे. काल 21 ऑक्टोबर रोजी भारताने 100 कोटी लस डोसचे लक्ष्य साध्य केलं आहे. या यशामागे 130 कोटी देशवासीयांचे कर्तव्य आहे, त्यामुळे हे यश भारताचे यश आहे, प्रत्येक देशवासीयांचे यश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुरुवारी देशानं 100 कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशानं एक नवा विक्रम केला. भारताने कोविडविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. भारतानं लसींचे 100 कोटी डोस देण्याचा आकडा पार केला. तसंच गेल्या 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या जागतिक साथीला सामोरे जाण्यासाठी देशाकडे आता लसींच्या 100 कोटी डोसचे मजबूत संरक्षण कवच आहे. हे भारताचे, देशातील प्रत्येक नागरिकाचं यश आहे.
We should be proud of the fact that India's entire vaccination program has been 'science-driven and science-based. It's based on scientific methods, entirely: PM Modi on India achieving 100-crore vaccination mark pic.twitter.com/yfM1LaLl2P
— ANI (@ANI) October 22, 2021
फ्रंटलाईन वर्कर्सचे आभार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, भारताने इतिहास रचला आहे. हा लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतवासियांचे अभिनंदन. आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि ज्यांनी-ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार. हेही वाचा- आजपासून चित्रपटगृहे Unlock,नाट्यगृहात होणार तिसरी घंटा भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं हा विक्रम पूर्ण केला आहे. हेही वाचा- नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची चौकशी होणार?, गृहमंत्री म्हणाले… जगातल्या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेतील हा मैलाचा दगड. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 जानेवारी 2021 रोजी ही देशव्यापी मोहीम सुरू केली होती. या वर्षभरात देशातल्या 944 दशलक्ष प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत यांपैकी 75 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. 31 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.