मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मलिकांच्या आरोपानंतर राज्य सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार?, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

मलिकांच्या आरोपानंतर राज्य सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार?, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 22 ऑक्टोबर: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं (NCB Raid) मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drugs Party) केलेल्या छापेमारी केली. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सतत एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officials Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, समीर वानखेडे हे केंद्र शासनाच्या सेवेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं म्हणत वळसे पाटील यांनी या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा-  आजपासून चित्रपटगृहे Unlock,नाट्यगृहात होणार तिसरी घंटा इतकंच नाही तर वर्षभरात तुझी नोकरी जाईल आणि (Nawab Malik on Sameer Wankhade) तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं जाहीर आव्हान नवाब मलिक यांनी समीर वानखडेला दिलं. त्यावरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना ते म्हणाले की, नवाब मलिक यांनी काही विधान केलं असेल तर त्याबाबत मला अद्याप काहीही माहिती नाही. तसंच त्यांनी असा कोणताही पुरावा माझ्याकडे अद्याप दिलेला नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेईन पण आता तरी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. नवाब मलिकांचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik tweets photos of Sameer Wankhede in Dubai) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेचे दुबईतील हॉटेलमधील फोटो ट्विट केले आहेत. आपण दुबईला गेलोच (Sameer wankhede denied the allegations) नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. काय आहे प्रकरण? समीर वानखडे या दुबईत जाऊन बॉलिवूड स्टार्सकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. वानखडे हा भ्रष्ट अधिकारी असून आपले काळे धंदे तो दुबईतून चालवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे आरोप धादांत खोटे असल्याचं सांगत आपण कधी दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता. त्यानंतर आता 10 डिसेंबर 2020 या दिवशी समीर वानखडे दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विटरवर अपलोड करत नवाब मलिक यांनी पुरावे देत असल्याचा दावा केला आहे. वर्षभरात तुझी नोकरी जाईल- नवाब मलिक वानखडेंचा बोगस कारभार पूर्णपणे बोगस असून त्याचा बाप आणि घरातले सगळे बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आपल्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि आता आपल्याला तो फोन करत आहे. यात आपला काहीच हात नसल्याचं तो सांगतो. असं असेल, तर हे बोगस प्रकार तू कुणाच्या सांगण्यावरून करतो आहेस, याचं उत्तर दे, असं आव्हान मलिकांनी वानखडे यांना दिलं आहे. हेही वाचा-  महिलेनं पतीसोबतची खासगी चॅट केली इन्स्टाग्रामवर शेअर; कोर्टाने सुनावली ही शिक्षा आपण तुझ्या बापाला घाबरत नसून तुझा कोण बाप आहे, ते मला सांगच, असं म्हणत मलिकांनी वानखडेला खडे बोल सुनावले आहेत. समीर वानखडेला तुरुंगात टाकल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. वर्षभरात समीर वानखडेची नोकरी जाईल आणि त्याचं सत्य महाराष्ट्रासमोर येईल, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nawab malik, NCP

    पुढील बातम्या