Home /News /national /

कोरोनाला रोखण्यासाठी 'या' राज्यात लॉकडाऊन वाढणार, मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींना आवाहन

कोरोनाला रोखण्यासाठी 'या' राज्यात लॉकडाऊन वाढणार, मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींना आवाहन

आर्थिक हानी भरुन काढता येते मात्र जीवित हानी भरुन काढता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे

नवी दिल्ली, 6 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 15 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे. कोरोनाबाधितांचा (Coronavirus) वाढता आकडा पाहता ही मर्यादा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे की लॉकडाऊनची मर्यादा वाढवली जावी. जनतेचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. घरात राहून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित - ‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टरांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा कोरोनासंदर्भातील परिस्थिती बिकट झाली तर लॉकडाऊनची मर्यादा वाढविल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे के. चंद्रशेखऱ यांचं म्हणणं आहे. अर्थव्यवस्थेतील हानी भरुन काढली जाऊ शकते मात्र जीवित हानी झाल्यास ती भरुन काढता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  Boston Group च्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन जूनपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे भारत सरकारला माझी विनंती आहे की तेलंगणातील लॉकडाऊनची मर्यादा वाढवली जावी, असं के. चंद्रेशखर राव यांनी म्हटले आहे. सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3500 च्या पार गेला आहे. अशावेळी नागरिकांनी लॉकडाऊनचं पालन करावं असं वारंवार प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. याशिवाय राज्य शासनही विविध क्लृप्त्या शोधून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करीत आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगबरोबरच घरात राहणं अत्यंत आवश्यक आहे. संबंधित - मुंबईत रूग्णांची संख्या वाढण्याची भीती, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला मोठा निर्णय
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या