Home /News /national /

भारतात कोळशाचा वापर पूर्ण थांबेल? जाणून घ्या काय असेल भविष्यातील स्थिती

भारतात कोळशाचा वापर पूर्ण थांबेल? जाणून घ्या काय असेल भविष्यातील स्थिती

coal

coal

ऐन दिवाळीच्या काळात देशात कोळसा संकट (Coal Crisis) निर्माण झालं आहे. देशामध्ये कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं वीज निर्मितीसुद्धा संकटात सापडली आहे.

    नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: ऐन दिवाळीच्या काळात देशात कोळसा संकट (Coal Crisis) निर्माण झालं आहे. देशामध्ये कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं वीज निर्मितीसुद्धा संकटात सापडली आहे. कारण, भारतातील बहुतेक विद्युत निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा वापर केला जातो. कोळशावर चालणाऱ्या दोन तृतीयांश प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक असल्याची माहिती उघड झाली आहे. देशातील विविध ठिकाणी भारनियमन लागू करण्याचा विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (1 नोव्हेंबर 2021) जागतिक हवामान परिषदेमध्ये (COP26) एक महत्त्वाची घोषणा केली. 2070पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य गाठेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यांनी केलेली घोषणा आणि देशातील कोळसा संकट यावर तज्ज्ञांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या भारतातील एकूण वीज गरजेपैकी 70 टक्के गरज भागवण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो. 2030 पर्यंत 50 टक्के बिगर जीवाश्म इंधन वापरणं आव्हानात्मक असेल. अशा परिस्थितीत पुढील पाच दशकांसाठी कोळसाच भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत राहील, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. लाईव्ह हिंदुस्ताननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने दिलेल्या (CEA) माहितीनुसार, सध्या आपल्याकडे कोळशाचा वापर करून 2 लाख 10 हजार मेगावॅट वीजनिर्मिती (Power generation) होते. एकूण परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात कोळशाचा वापर वाढणार आहे. भारतामध्ये 2030 पर्यंत कोळशाचा वापर करून 2 लाख 67 हजार मेगावॅट क्षमतेपर्यंत वीज निर्मिती केली जाऊ शकते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान परिषदेमध्ये 'झिरो कार्बन उत्सर्जना'चं वचन दिल्यानं कोळशाची उपयुक्तता नाहीशी होईल की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, भारतातील वीज निर्मितीक्षेत्रात कोळशाची गरज आहे त्यामुळे हवामान परिषदेत दिलेल्या वचनाचा थर्मल कोळशाच्या वापरावर परिणाम होणार नाही, असं मत डेलॉइट टच तोहमात्सु समूहाचे (Deloitte Touche Tohmatsu) भागीदार देबाशिष मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. पुढील पाच दशकांपर्यंत भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम कोळसा करत राहील. 2040च्या दशकामध्ये कोळशाची सर्वात जास्त गरज भासेल. त्यामुळे कोळसा खाणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सातत्यानं गुंतवणूक करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला यावर्षी ऑक्टोबरमध्ये ज्या इंधन संकटाचा सामना करावा लागला, तशा प्रकारच्या अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं, असं देखील मिश्रा म्हणाले. कोल इंडियाचे माजी अध्यक्ष पार्थ सारथी भट्टाचार्य यांनी कोळशाची उपलब्धता आणि वापराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भट्टाचार्य म्हणाले, 'कोळसा उपलब्ध होत राहील सुरुवातीला तर त्याचा वापर वाढवावा लागेल. त्याच्या वापराचं प्रमाण कमी होईल पण कोळश्याची गुणवत्ता लक्षात घेता आताच्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचा कोळसा उपलब्ध होईल.’
    First published:

    Tags: India, Narendra modi, PM narendra modi

    पुढील बातम्या