नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं. या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.
Today I want to tell everyone that we have decided to repeal all three farm laws: PM Narendra Modi pic.twitter.com/ws353WdnVB
— ANI (@ANI) November 19, 2021
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे. हेही वाचा- Mumbai: विनामास्क फिरणाऱ्या महिलेकडे मागितला दंड, महिला आणि क्लीन-अप मार्शल्समध्ये हाणामारी, मुंबईतील VIDEO VIRAL
गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषी कायदे आणले. पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचं कृषी प्रदर् पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. पण उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित केलं. पीएमओनं या संदर्भातलं ट्विट करुन माहिती दिली होती. असा असेल मोदींचा उत्तर प्रदेश दौरा दोन दिवसांपूर्वी पीएम मोदी राज्याच्या पूर्वांचलच्या दौऱ्यावर होते आणि तेथे त्यांनी अनेक विकास योजनांचे उद्घाटन केलं. तसंच नवीन योजनांची पायाभरणी केली. दरम्यान आज पीएम मोदी बुंदेलखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी झाशी आणि महोबामध्ये मोठ्या योजना सुरू करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक योजना आणि प्रकल्प सुरू करणार आहेत. त्यानंतर मोदी लखनऊला जातील आणि दिल्लीला परतण्यापूर्वी शनिवारी आणि रविवारी डीजीपींच्या परिषदेत सहभागी होतील.
हेही वाचा- IIT बॉम्बेनं केलं Alert! तुमच्या घरातच आहे Corona चा 10 पट जास्त धोका
तसंच मोदींच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त ‘झाशी जलसा महोत्सवा’च्या समारोपासाठी पंतप्रधान झाशीत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या झाशी नोड येथे भारत डायनामिक्सच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि मेगा सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील.