कोविड-19 च्या संसर्गाचा धोका अजून टळला नाही आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग (Covid-19 Infection) घरातील दरवाजे, खोलीच्या कोपऱ्यात, फर्निचरभोवती, वॉश बेसिनच्या वर जास्त असतो. अशा ठिकाणी हवेचा प्रवाह मंद असतो, त्यामुळे कोरोना व्हायरस (Coronavirus) हवेत 10 पट जास्त काळ राहण्याची शक्यता आहे. IIT बॉम्बेच्या (IIT Bombay) संशोधकांनी ही माहिती दिली आहे.
IIT बॉम्बेच्या (IIT Bombay) संशोधकांनी सांगितलं आहे की खोल्यांमध्ये योग्य वेंटिलेशन असावं, जेणेकरून ताजी हवा खोलीत येत राहते. त्यांच्या संशोधनात त्यांनी सार्वजनिक शौचालयातील हवेच्या प्रवाहाचा अभ्यास केला. बंद खोल्या, बंद वॉश रूम इत्यादींमध्ये कोरोना व्हायरसचा धोका अधिक असतो, अशा परिस्थितीत जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांचं म्हणणे आहे.
संशोधकांनी सांगितलं की संसर्गजन्य रोग निर्माण करणारे एरोसोल खोल्यांमध्ये, कोपऱ्यांमध्ये आणि योग्य वेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी 10 पट जास्त काळ टिकू शकतात. ते म्हणाले की अशा वेळी जेव्हा रेस्टॉरंट्स, थिएटर, मॉल्स आणि शाळा आणि महाविद्यालयांसह इतर सार्वजनिक ठिकाणे मोठ्या प्रमाणात उघडली जात आहेत. त्यावेळी आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. टीमनं सांगितलं की, खोलीतील हवा सतत ताज्या हवेत बदलली पाहिजे, मात्र ती दारामागील, कोपऱ्यात, फर्निचरभोवती किंवा अडथळ्याच्या मागे असलेल्या भागात बदलत नाही.
हेही वाचा- तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? काय असतं याचं कारण? घरगुती उपाय जाणून घ्या
संशोधकांनी अशा ठिकाणांना मृत क्षेत्र म्हटलं आहे. ज्यामध्ये हवा बराच काळ अडकलेली असते आणि गोलाकार गतीने फिरते. दरम्यान खिडक्या, पंखे, एअर कंडिशनर आणि एक्झॉस्ट पंखे खोलीच्या बहुतेक भागांना हवेशीर ठेवतात. एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे संशोधक आणि प्राध्यापक कृष्णेंदू सिन्हा यांनी सांगितले की, कॉम्प्युटर सिम्युलेशन वापरून खोलीतील हवेचं क्षेत्र ओळखण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांना बंद खोल्यांमध्ये हवेचा प्रवाह अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबंधित कसा करता येईल याचा अभ्यास करण्यास प्रेरित केलं. याद्वारे कोविडचा प्रसार कमी करण्यासाठी बंद खोल्यांमध्ये योग्य वेंटिलेशनचे महत्त्व दाखवण्यात आले. यामध्ये कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापर प्रभावी ठरला.