सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबईत (Mumbai) विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर क्लीन-अप मार्शल्स (Clean up marshals)कडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. यावेळी क्लीन अप मार्शल आणि नागरिकांत अनेकदा वाद होण्याच्या घटना समोर येत आहेत. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दंड भरण्यावरुन झालेल्या वादानंतर संतप्त महिलेने दोन क्लीन-अप मार्शल्सला मारहाण केली. (Clean up marshals beaten by woman in Mumbai, video goes viral) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना अंधेरी पश्चिम परिसरातील एस व्ही रोडवरील आहे. संध्याकाळच्या सुमारास एक महिला रिक्षामधून बाहेर निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील मास्क हा तोंड्याच्या खाली होता. हे पाहून क्लीन-अप मार्शल्सने त्या महिलेला दंड भरण्यास सांगितले आणि दंडात्मक कारवाईची पावती दिली. दंडात्मक कारवाईवरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हा हाणामारीत क्लीन-अप मार्शल गंभीर जखमी झाली आहे. या क्लीन अप मार्शलला उपचारासाठी रूपक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा : ST महामंडळाचं खासगीकरण होणार? यापूर्वी माटुंग्यात क्लीन अप मार्शलला नागरिकांनी बदडलं सप्टेंबर महिन्यात माटुंगा परिसरात नागरिकांनी क्लीन अप मार्शलला मारहाण केल्याचा व्हिडीओ जव्हायरल झाला होता. माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीन अप वाल्यांची दादागिरी पाहायला मिळाली होती. दंडाच्या पैशापेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यामुळे सर्व त्रस्त जनतेने त्याला जाब विचारला. त्यादरम्यान वाद झाला असल्याची माहिती मिळाली. क्लीन अप मार्शलच्या भोवती नागरिक जमा झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या क्लीन अप मार्शलच्या हातात एक दगड असून तो नागरिकांना दगड फेकून मारण्याची धमकी देताना दिसत आहे. एका नागरिकाच्या पोटात या क्लीन अप मार्शलने गुद्दाही लगावला. त्यानंतर आक्रमक झालेल्या लोकांनी या क्लीन अप मार्शलला चांगलाच झोडपलं. एकाने तर त्याच्या डोक्यात हेल्मेटही मारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर या क्लीन अप मार्शलने तिथून पळ काढला. मुंबईत क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीये. संतप्त नागरिक अंगावर येत असल्याचे पाहुन या क्लीन अप मार्शलने दगडे मारण्यास सुरुवात केली. हा प्रसंग खूप वेळ चालू होता पोलीस येण्यास खूप उशीर झाला. नेहमी पोलीस नाकाबंदीसाठी उभे असतात, पण अशा घटना घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा वेळ का घेते? असा प्रश्न विचारला जात आहे. कोणाचा जीव गेल्यावर पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि सरकार अशा गोष्टीत लक्ष घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महानगरपालिका आणि सरकारने कोरोनाच्या नावाने होणारी लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







