मराठी बातम्या /बातम्या /देश /

Farm Laws मागे घेतल्यानंतर मोदी सरकारबद्दल पाकिस्तानी माध्यमांनी काय म्हटलंय वाचा

Farm Laws मागे घेतल्यानंतर मोदी सरकारबद्दल पाकिस्तानी माध्यमांनी काय म्हटलंय वाचा

Agriculture Reform laws: शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर (Farmers protest) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर जगाची काय आहे प्रतिक्रिया?

Agriculture Reform laws: शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर (Farmers protest) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर जगाची काय आहे प्रतिक्रिया?

Agriculture Reform laws: शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर (Farmers protest) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर जगाची काय आहे प्रतिक्रिया?

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: प्रामुख्याने पंजाबमधल्या अनेक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत असलेले तीन कृषी कायदे अखेर मागे घेत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (19 नोव्हेंबर) गुरुनानक जयंतीचं औचित्य साधून जाहीर केला. शेतकऱ्यांच्या दीर्घ काळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केला असल्याने देशभरात तर याची चर्चा झालीच; मात्र जगभरातल्या माध्यमांनीही या निर्णयाची दखल घेतली. ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, पाकिस्तान आदी देशांतल्या वेबसाइट्स आणि वृत्तपत्रांनी या घडामोडीला प्रमुख स्थान दिलं आहे. 'अखेर मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावं लागलं. शेतकरी जिंकले, सरकार हरलं,' असंच सगळ्या वृत्तपत्रांच्या वृत्तांचं सार आहे. जगभरातल्या वृत्तपत्रांनी याबद्दल नेमकं काय म्हटलं आहे, याविषयीचं वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केलं आहे.

दी गार्डियन (The Guardian) या ब्रिटिश वृत्तपत्राने लिहिलंय, की 2020 मध्ये जेव्हा हे कृषी कायदे आणण्यात आले होते, तेव्हा असं वाटलं होतं, की सरकार शेती क्षेत्राचा पूर्ण ढाचा बदलू इच्छित आहे. देशातली 60 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्णयावर सर्वांची नजर होती. ज्या शेतकऱ्यांसाठी सरकारने कायदे बनवले, त्यांच्याशी बातचीत न करताच सरकारने कायदे केले, असा शेतकऱ्यांचा आक्षेप होता. या कायद्यांमुळे त्यांची रोजीरोटी आणि जीवनच धोक्यात आलं होतं.

आंदोलन मागे घेण्यासाठी राकेश टिकैत यांनी ठेवली 'ही' अट

भारताचा सख्खा शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या डॉन (The Dawn) या वृत्तपत्राच्या वेबसाइटने वृत्तसंस्थांच्या हवाल्याने या निर्णयाची बातमी प्रसिद्ध केली. 'शेती कायद्यांबाबत मोदींना पाऊल मागे घ्यावं लागलं' अशा आशयाचं शीर्षक बातमीला देण्यात आलं होतं. 'द डॉन'ने दोन शीख शेतकरी एकमेकांना मिठाई भरवत असल्याचा फोटोही प्रसिद्ध केला. तसंच पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. पाकिस्तानातल्या geo.tv आणि tribune.com.pk यांसारख्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवरच्या वृत्तांचं सारही असंच होतं.

'पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला' अशा आशयाचं वृत्त theglobeandmail या कॅनडातल्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं. 'आता आपल्याला नवी सुरुवात करायला हवी, असं मोदींनी म्हटलं आहे. प्रकाशपर्वाच्या औचित्याने मोदींनी जाहीर केलेल्या या निर्णयाचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. याची राजकीय कारणं महत्त्वाची आहेत. गेल्या सप्टेंबरपासून विरोध होत असल्याने सरकारच्या अडचणी वाढत चालल्या होत्या,' असं या वृत्तपत्राने म्हटलं आहे. thestar.com नेही अशाच आशयाचं वृत्त दिलं आहे.

Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणार, वाचा 5 ठळक मुद्दे

 नरेंद्र मोदी यांचं भाषण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच न्यूयॉर्क टाइम्सच्या (NYT) वेबसाइटवर ही बातमी फ्लॅश झाली. न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं आहे, की जवळपास एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलनापुढे पंतप्रधान मोदींना अखेर नमावं लागलं. सरकारने नरमाईचं धोरण स्वीकारून कायदे मागे घेण्याचं ठरवलं. आंदोलक शेतकऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आंदोलकांमध्ये शीखांचं प्रमाण मोठं होतं. कदाचित म्हणूनच प्रकाशपर्वाच्या औचित्याने मोदींनी हा निर्णय जाहीर केला.

...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांसमोर हात जोडले

सीएनएनने (CNN) मोदी यांचं भाषणं जसंच्या तसं प्रसारित केलं. शेतकरी नेते दीपक लांबा यांच्या हवाल्याने सीएनएनच्या वृत्तात असं लिहिण्यात आलं होतं, की हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. मोदी सरकारने हा निर्णय अपरिहार्यतेमुळे घेतला आहे. भारत कृषिप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना नाराज करण्याची जोखीम कोणीही घेऊ शकत नाही. पुढच्या वर्षी सात राज्यांत निवडणुका आहेत. मोदी यांना सत्तेत राहायचं असेल, तर त्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं नव्हतं. या सातपैकी सहा राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

First published:

Tags: Agricultural law, Farmers protest, Narendra modi, Pakistan, USA