• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा, तरीही राकेश टिकैत यांनी ठेवली 'ही' अट

कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा, तरीही राकेश टिकैत यांनी ठेवली 'ही' अट

कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करत पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केलं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे (all the three agricultural laws) घेणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं. यावेळी मोदींनी माफीही मागितली आहे. कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करत पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केलं. या सगळ्यात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) शेतकरी आंदोलन तातडीनं मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं संकेत दिले आहेत. आंदोलन तातडीने मागे घेणार नसल्याचं राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. राकेश टिकैत यांनी असेही स्पष्ट केले आहे की, किमान आधारभूत किमती (MSP) सोबतच सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा केली पाहिजे. हेही वाचा- ...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांसमोर हात जोडले दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (शहाजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर) गेल्या एक वर्षांपासून यूपी, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक 26 नोव्हेंबर 2020 पासून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं. या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
    Published by:Pooja Vichare
    First published: