मराठी बातम्या /बातम्या /देश /

Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणार, वाचा 5 ठळक मुद्दे

Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणार, वाचा 5 ठळक मुद्दे

Three Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशवासीयांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली.

Three Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशवासीयांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली.

Three Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशवासीयांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशवासीयांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, सरकार तिन्ही कृषी कायदे मागे (Three Farm Laws) घेणार असून आगामी संसदेच्या अधिवेशनात (Parliament Session) आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. केंद्र सरकार यासाठी समिती स्थापन करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी महाअभियानात तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना अधिक शक्ती मिळावी आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, हा त्यामागचा हेतू होता. वर्षानुवर्षे देशातील कृषी तज्ज्ञ, संघटना आणि शास्त्रज्ञ ही मागणी करत होते. यापूर्वीही अनेक सरकारांनी मंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि आम्ही कायदा आणू. देशाच्या कानाकोपऱ्यात विविध शेतकरी संघटनांनी स्वागत आणि पाठिंबा दिला. आज त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.

पंतप्रधान मोदींच्या संबोधनातील 5 मोठ्या गोष्टी

देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, 'मी जे काही केले ते सर्व शेतकऱ्यांसाठी केले आहे. मी जे काही करत आहे ते देशासाठी करत आहे. देशवासीयांच्या आशीर्वादाने मी माझ्या मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही. आज मी तुम्हाला खात्री देतो की मी अजून मेहनत करेन. जेणेकरून तुमची स्वप्ने आणि राष्ट्राची स्वप्ने पूर्ण होतील.

हेही वाचा- मोदी सरकारने मागे घेतले तीनही केंद्रीय कृषी कायदे, राकेश टिकैत म्हणाले...

पीएम मोदी म्हणाले की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया या महिन्यात संसदेच्या आगामी अधिवेशनापासून सुरू होईल. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या घरी परत जावं आणि नव्याने सुरुवात करावी.

पीएम म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना स्वस्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचे काम केले. सूक्ष्म सिंचनासह सिंचन योजना सुरू केल्या. 22 कोटी सॉईल कार्ड बनवण्यात आले. हे सर्व कृषी उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात आले. त्याच वेळी आम्ही पीक विमा योजना सुरू केली आणि त्याअंतर्गत शेतकरीही जोडले गेले.

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला पूर्ण आणि योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. आम्ही ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत केल्या. आम्ही केवळ एमएसपी वाढवली नाही तर सरकारी खरेदीही विक्रमी उच्चांकावर नेली. आपल्या सरकारने केलेल्या पिकांच्या खरेदीने गेल्या दशकांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

2014 मध्ये मी पंतप्रधान झालो तेव्हा आमच्या सरकारची प्राथमिकता शेतकर्‍यांचे कल्याण आणि विकास होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशातील 100 पैकी 80 शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे हे अनेकांना माहीत नाही. या शेतकऱ्यांची लोकसंख्या 10 कोटींहून अधिक असून, त्यांचे उदरनिर्वाहही याच जमिनीवर आहे.

त्यानंतर पंतप्रधानांनी देह सिवा बरु मोहि इहै सुभ करमन ते कबहूं न टरों या घोषणेनं भाषणाचा समारोप केला. जो गुरुगोविंद सिंग यांच्या दशम ग्रंथातील चंडी चरित्रातील आहे.

First published:

Tags: Narendra modi