जाहिरात
मराठी बातम्या / देश / PM मोदींचे जबराट फॅन! पंतप्रधानांना विजयी करण्यासाठी सायकलवरून करतायेत भारताचा दौरा - 905114

PM मोदींचे जबराट फॅन! पंतप्रधानांना विजयी करण्यासाठी सायकलवरून करतायेत भारताचा दौरा - 905114

पंतप्रधान मोदींचे चाहते

पंतप्रधान मोदींचे चाहते

तुम्ही पंतप्रधान मोदींचा असा चाहता पाहिला नसेल.

  • -MIN READ Local18 Delhi
  • Last Updated :

अभिषेक तिवारी, प्रतिनिधी दिल्ली, 17 जून : आत्तापर्यंत तुम्ही क्रिकेटपटू, बॉलीवूड अभिनेते तसेच राजकारण्यांचे अनेक चाहते पाहिले आणि ऐकले असतील, पण आज News18 लोकल तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अशा तीन चाहत्यांबद्दल सांगणार आहे. हे तिन्ही चाहते, लाखो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून प्रवास करत आहेत. ते दिल्लीला पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया येथून पंतप्रधान मोदींचा हे चाहता सायकलवरून संपूर्ण भारताचा दौरा करण्यासाठी निघाले आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहारमार्गे ते संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. ते सध्या दिल्ली पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींना भेटल्याशिवाय पुढे जाणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

News18लोकमत
News18लोकमत

भारतभर सायकल दौऱ्यावर गेलेले भगतसिंग म्हणाले की, मी मोदीजींच्या कामावर खूप खूश आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा विजयी व्हावे आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी माझी इच्छा आहे. मी तमाम देशवासीयांना सांगू इच्छितो की, मोदीजींनी देशासाठी जे काही केले आहे, त्यामुळेच मी सायकलवरून फिरून त्यांचा प्रचार करत आहे. याआधी 2016 मध्येही मी सायकल टूर केली आहे. ‘पीएम मोदींना भेटल्याशिवाय परत जाणार नाही’ भगतसिंग यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मोनू यादव आणि निरंजन मौर्य यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याशिवाय दिल्लीच्या पुढे जाणार नसल्याचे सांगितले. जोपर्यंत मोदीजी भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडून पुढे जाणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात