नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुरुवारी 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोदींवर सोशल मीडिया आणि नमो अॅपवरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. फक्त देशातूनच नाही तर जगभरातून त्यांना राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवशी त्यांना सोशल मीडियावर आणि मनो अॅपद्वार काय गिफ्ट हवं असं लोकांनी विचारलं. याबाबत पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. 'माझ्या वाढदिवशी मला काय गिफ्ट हवं हे अनेकांनी मला विचारलं. ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या 6 गोष्टी मला तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
1. कोरोनाच्या महासंकटात मास्क नीट वापरा आणि योग्य पद्धतीनं वापरा.
2. सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पद्धतीनं पालन करा.
3. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कसोशिनं टाळा आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
5. दोन फुटांचं अंतर कायम ठेवा
6. पृथ्वीला निरोगी बनवण्यासाठी प्रयत्न करा.
People from all over India, from all over the world have shared their kind wishes. I am grateful to each and every person who has greeted me. These greetings give me strength to serve and work towards improving the lives of my fellow citizens.
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी पंतप्रधानांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करतात. भाजप पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आठवड्याभरात देशाच्या विविध भागात रक्तदान शिबिरे आयोजित करतात, गरजूंमध्ये फळांचे वितरण आणि गरजूंना मदत अशा योजना आठवडाभर राबवल्या जातात.
हे वाचा-'मनमोहन सिंगांनी गुजरातला मदत केली होती, आता मोदी सरकारचे हे कर्तव्यच'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस. देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. परदेशातल्या काही बड्या नेत्यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवून मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असल्याचं रशियन अध्यक्षांनी म्हटलं आहे. तसंच रशिया- भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात मोदींचं वैयक्तिक योगदान मोठं असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. भारत-चीन सीमेवर तणाव असताना या शब्दांत पुतिन यांनी वैयक्तिकरीत्या भारतीय पंतप्रधानांना शुभेच्छा देणं विशेष मानलं जात आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'