Home /News /national /

Oxygen तुटवडा दूर करणाऱ्या टाटांचं न्यायालयाकडून कौतुक तर मोदी सरकारला फटकारले

Oxygen तुटवडा दूर करणाऱ्या टाटांचं न्यायालयाकडून कौतुक तर मोदी सरकारला फटकारले

देशभरातील विविध राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल: भारतातील अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) बुधवारी रात्री सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या (Central Government) नियोजनावर ताशेरे ओढले तर त्याचवेळी टाटा सन्सचं कौतुकही केलं आहे. जर टाटा करु शकतात तर इतर का नाही? न्यायालयाने म्हटलं, जर टाटा सन्स आपल्या स्टील प्लांटमधून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास पुढाकार घेऊ शकतात तर इतर स्टील प्लांट का नाही करु शकत. उद्योगांना एक किंवा दोन आठवडे ऑक्सिजन मिळाल नाही तर काम पुढे ढकललं जाऊ शकतं. मात्र, जर मनुष्यालाच ऑक्सिजन मिळालं नाही तर तो पुढे जाऊ शकत नाही या शब्दांत न्यायालयाने प्रतिक्रिया दिली आहे. वाचा: Oxygen तुटवडा दूर करण्यासाठी टाटांचा पुढाकार; पंतप्रधानांनी केलं कौतुक न्यायालयाने पुढे म्हटले की, असे दिसत आहे की, सरकारला मनुष्याच्या जीवनाचे महत्व नाहीये. केंद्राने स्टील प्लांटद्वारे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचा संपूर्णपणे ताबा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा करावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. देशाला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काय केले? दिल्ली उच्चन्यायालयाने केंद्र सरकारला म्हटलं, आमची चिंता केवळ दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या संदर्भात नाहीये तर संपूर्ण देशातील ऑक्सिजनच्या पुरवठ्या संदर्भात आहे. देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलली आहेत अशी विचारणा यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली.
    First published:

    Tags: Coronavirus, Modi government, Oxygen supply

    पुढील बातम्या