नवी दिल्ली, 24 मे : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाचे 1.31 लाख प्रकरणं समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 3867 लोकांचा कोरोनामुळे (Covid -19) मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं आहे. हे अंतर इतकं आहे की आपल्या जवळच्या कोरोनाबाधिताचा मृतदेह स्वीकारण्यासही लोक तयार नाहीत. अशातच जयपूरमधील विष्णू निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. ते व त्यांच्या टीमने मिळून आतापर्यंत 68 कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला आहे. कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे विष्णूलाही कोरोना वॉरिअर म्हटले जात आहे. विष्णूसह त्याची मोठी टीम कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. विष्णू आणि त्यांची टीम हे काम करण्यासाठी धर्म-जातीचा भेदभावही करत नाही. त्यांनी अंत्यसंस्कार केलेल्यांमध्ये 15 मुस्लीम मृतदेहांचे दफन करण्यात आवे आहे आणि 53 मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे. अनेकदा नातेवाईक रुग्णालयांमध्ये मृतदेह तसाच ठेवून निघून जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. हा मृतदेह तासनतास रुग्णालयात पडून राहतो. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांनी त्यांची शेवटची क्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे. हे वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार आरोग्य योजनेचा लाभ देवासारखा धावून आला कोरोना योद्धा; नवजात बाळासह पायी जाणाऱ्या माऊलीला केली मदत ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार, भारतीय वंशाचा तरुण आखतोय नवी स्कीम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







