लंडन, 24 मे : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये दिवसागणिक बदल होत असल्याने अधिक जागरुक राहणे गरजेचे आहे. त्यातही कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी असल्याचे त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते आणि अशांना मृत्यूचा धोका असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मधुमेह, श्वासोच्छवास आणि फुप्फुसांसंबंधित आजार आणि अन्य गंभीर आजार असण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे. या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका बीएमजेनुसार 50 वर्षापेक्षा जास्त पौढ, पुरुष, स्थुलत्व, ह्रदयरोग, फुप्फुस, मूत्रपिंड आदी संदर्भातील आजार असलेल्या कोरोना बाधितांना मृत्यूचा धोका असतो. 43000 हून जास्त रुग्णांचा केला अभ्यास आतापर्यंत याबाबत केलेल्या अभ्यासात ब्रिटेनचे लिव्हरपूल विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांसह अन्य सर्वांनी इंग्लंडमधील रुग्णालयात भरती झालेले कोविड – १९ रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. अध्ययन प्रकाशित होईपर्यंत यामध्ये 43000 हून जास्त रुग्णांचा सहभाग करण्यात आला आहे. या रुग्णांना सर्वाधिक त्रास वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिलदरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील 208 रुग्णालयात भरीत झालेल्या 20133 रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झालेल्यांचे वय सर्वसाधारण 73 होते आणि महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. वयाबरोबरच ज्यांना ह्रदय, फुप्फुस, यकृत. मूत्रपिंज आदीबाबत आजार असलेल्यांना अधिक त्रासाचा सामना करावा लागत होता. भारतात या वयाच्या नागरिकांना सर्वाधित धोका कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयानुसार सांगितले जात आहे की, मृत्यूच्या विश्लेषणानुसार कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांमध्ये 64 टक्के पुरुण आणि 36 टक्के महिला आहेत. हे वाचा - कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर योद्ध्याने केले अंत्यसंस्कार देवासारखा धावून आला कोरोना योद्धा; नवजात बाळासह पायी जाणाऱ्या माऊलीला केली मदत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







