जाहिरात
मराठी बातम्या / देश / Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीनं घेतला हा मोठा निर्णय

Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीनं घेतला हा मोठा निर्णय

Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीनं घेतला हा मोठा निर्णय

Paytm द्वारे होणाऱ्या transactionवर जास्त पैसे आकारले जाणार असल्याच्या बातमीवर Paytmनं आपली बाजू मांडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै : Paytm आता क्रेडिट कार्ड द्वारे होणाऱ्या transaction वर 1 टक्के, debit cardद्वारे होणाऱ्या transactionवर 0.9 टक्के आणि UPIद्वारे होणाऱ्या transaction वर 12 ते 15 रूपयांचा चार्ज आकारला जाणार असं बोललं जात होतं. पण, Paytmनं यावर आपली बाजू मांडली असून Digital transactionवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाहीत असं म्हटलं आहे. दरम्यान, सरकारनं देखील Digital transactionबाबत नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे RTGS आणि NEFTकरताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. शिवाय, Paytm जास्त पैसे आकारणार असल्याच्या बातमीचं देखील Paytmनं खंडन केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना आता डबल धमाका ENJOY करता येणार आहे. सध्या Online Paymentसाठी Paytm वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपली बाजू मांडताना Paytmनं सर्व गोष्टी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. RTGS आणि NEFTद्वारे Money Transfer बिधनास्त करा; होणार हा फायदा काय आहे बँकांचा नवा नियम? RBIच्या नव्या नियमांमुळे आता ऑनलाईन Money Transfer स्वस्त झाले आहे. RTGS आणि NEFTवर कोणतेही शुल्क लावण्यात येणार नसल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हटलं होतं. 1 जुलै अर्थात आजपासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे Online व्यवहार करणं आणखी सोप्प झालं आहे. Online Transitionला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं RTGS आणि NEFTवर जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. मोठी रक्कम पाठवण्यासाठी RTGS केलं जातं. तर, 2 लाखापर्यंतची रक्कम ही NEFTद्वारे पाठवली जाते. पण, Online Transitionला कोणतेची चार्ज आकारले जाणार नाहीत. ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारनं नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे हे नक्की. VIDEO: अख्खी मुंबई पाण्यात तुंबली, पाहा पावसाचे आताचे अपडेट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm
  • First Published :
जाहिरात
जाहिरात