पाटणा, 6 फेब्रुवारी : प्रेमात ऐकमेकांना पत्र लिहणे नवीन नाही. पूर्वी हाताने पत्र लिहलं जायचं आता, मोबाईलद्वारे पाठवलं जातं. माध्यम जरी बदललं असलं तरी भावना मात्र त्याच आहेत. मात्र, बिहारच्या एका तरुणीने चक्क उपमुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहलं आहे. आपल्या मजेशीर पत्रातून त्यांनी आपल्या एकतर्फी प्रेमाची कबुली उपमुख्यमंत्र्यांजवळ दिली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बनारस वाला इश्क या कादंबरीने प्रसिद्ध झालेल्या बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील तरुण लेखक प्रभात बांधुल्य यांच्या प्रेमात पाटणाची पिंकीही पडली आहे. पण समस्या तिच्या बेरोजगारीची आहे. त्यामुळेच तिने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सोशल मीडियावर एक भावूक आणि मार्मिक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये पिंकी एका लेखकाच्या एकतर्फी प्रेमात असल्याचे सांगत आहे. पण नोकरी न मिळाल्याने ती ज्याच्यावर प्रेम करते, त्याचं दुसऱ्याशी लग्न होऊ शकते, अशी पिंकीला भीती वाटते.
'प्रेमविवाह करून तुम्ही निवांत झाला..'
असे म्हणतात की शरद ऋतूनंतर पावसाळा आणि नंतर वसंत ऋतू येतो. आजकाल वसंत ऋतूचा महिना म्हणजेच फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. अशा परिस्थितीत पिंकी नावाच्या मुलीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पत्र लिहिले आहे. बनारस वाला इश्क या पुस्तकाचे लेखक प्रभात बांधुल्य यांचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
पत्रात बेरोजगार पिंकी तेजस्वी यादव यांना लिहिलं आहे की, तुम्ही प्रेमविवाह केला, पण बेरोजगारी आमच्या लग्नात अडथळा ठरत आहे. हे पत्र अतिशय मजेशीर पद्धतीने लिहिले आहे, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या तरी पिंकी कोण आहे? हे समोर आलेले नाही.
बनारस वाला इश्कच्या लेखकानेही दिली प्रतिक्रिया
पिंकी नावाचे हे पत्र व्हायरल झाल्यानंतर बनारस वाला इश्क या कादंबरीच्या लेखकानेही आपल्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, 'जेव्हा प्रेमपत्र दुसऱ्याला पाठवायचे होते, तेव्हा पिंकीजींनी माझे नाव मधेच का टाकले? बरं ते पत्र आता बातमीत आलंय आणि आम्हीही त्याच निमित्तानं.
वाचा - Valentine Day : गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडल्यास काय कराल? हे अधिकार माहीत आहे का?
प्रिय तेजस्वी,
उपमुख्यमंत्री, बिहार
तुम्हाला माहीत नसेल की मी प्रचंड तणावात आहे. तुम्ही प्रेमविवाह केला. पण आमच्या लग्नामध्ये बेरोजगारी अडचण आहे. प्रभात बंधुल्यासोबत चार वर्षांपासून आमचे एकतर्फी प्रेम आहे. लफडं करण्याच्या वयात चालू घडामोडी वाचत आहे. नोकरी मिळाली तर प्रपोज करेन असं वाटलं होतं, पण नोकरी मिळू शकली नाही. एक तर जागा निघत नाही आणि निघाली तर पेपर फुटतो. हे सर्व पाहून असे वाटते की हा व्हॅलेंटाइन निघून जाईल आणि आपण प्रपोज करू शकणार नाही. दुसरीकडे, आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहोत आणि बाबूजी आमच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. आमच्या सर्व मैत्रिनींनाही लग्नानंतर मुलं झाली. या सगळ्याचा विचार करून मन खूप निराश होत आहे. मी खूप आशेने हे पत्र लिहित आहे, नोकरीचा जुगाड लावा, नाहीतर लेखक काही जुगाड करून फरार होईल. प्रेम आणि नोकरी घेतल्याशिवाय काय करणार?
तुमची मतदार आणि लेखक प्रभात बांधुल्य यांची एकतर्फी प्रेयसी पिंकी (पाटणाहून).
कोण आहे प्रभात बांधुल्य?
प्रभात हे बिहारच्या औरंगाबाद येथील रहिवासी आहे. 'बनारस वाला इश्क' ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ते टीव्ही मालिका आणि चित्रपटाच्या स्क्रिप्ट रायटिंगच्या कामात व्यस्त आहेत. प्रभात हे बीएचयू लॉ स्कूलचे विद्यार्थी आहे. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले प्रभात सध्या पाटणा उच्च न्यायालयात वकील आहेत. तरुणांच्या मनाला स्पर्श करण्यासाठी प्रभात प्रसिद्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Valentine Day, Valentine week