Home /News /national /

पार्टनर स्वॅपिंग रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश; 1000 हून अधिक जोडप्यांचा सहभाग, 7 जणांना अटक

पार्टनर स्वॅपिंग रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश; 1000 हून अधिक जोडप्यांचा सहभाग, 7 जणांना अटक

लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराची आदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (partner swapping racket) केला आहे.

    कोट्टायम, 10 जानेवारी: लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराची आदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (partner swapping racket) केला असून सात जणांना अटक (7 arrested) केली आहे. या रॅकेटमध्ये एक हजाराहून अधिक जोडप्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पार्टनर स्वॅपिंग रॅकेटमध्ये अडकलेल्या एका तरुणाच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीसह सात जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना केरळातील (Kerala) कोट्टायम (Kottayam) जिल्ह्यातील आहे. या प्रकरणी करुकचल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गृहीणी आहे. तर तिचा पती 'कपल शेअरींग' ग्रुपचा (Couple sharing group) मेंबर आहे. पीडित महिलेनं परपुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवावेत, यासाठी फिर्यादीचा पती तिच्यावर दबाव आणत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने करुकचल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह 'कपल शेअरींग' ग्रुपशी संबंधित असणाऱ्या त्याच्या सात मित्रांना अटक केली आहे. हेही वाचा-शनिवारची रात्र ठरली काळरात्र;नवविवाहित जोडपं झोपेतून उठलंच नाही, हृदयद्रावक शेवट याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 'कपल शेअरींग' ग्रुपमधील आणखी 25 जणांवर पाळत ठेवली जात आहे. पुढील काही दिवसात आणखी काही आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता आहे. तसेच केरळ राज्यातील तब्बल 1000 हून अधिक जोडपे या 'पार्टनर स्वॅपिंग रॅकेट'मध्ये गुंतले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामध्ये अनेक उच्चभ्रू सोसायटीतील जोडप्यांचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-नागपूर: ऑनलाइन प्रेमात तरुणाची हद्द पार; 17 वर्षीय मुलीसोबत घडला विचित्र प्रकार नेमकं प्रकरण काय आहे? वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने IANS वृत्त संस्थेला सांगितलं की, पार्टनर स्वॅपिंग करण्यासाठी सर्वप्रथम त्यांना एका टेलिग्राम ग्रुप जॉइन करायला सांगितलं जात होतं. त्यानंतर, दोन ते तीन जोडपे एकत्र येऊन आपापल्या बायकांची आदलाबदल करत लैंगिक संबंध ठेवत होते. काहीवेळा महिलांना एकाच वेळी तीन पुरुषांशी संबंध ठेवायला भाग पाडलं जात होतं. त्याचबरोबर पार्टनर स्वॅपिंगमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सिंगल व्यक्तीकडून पैशांची आकरणी केली जात होती. यामध्ये काहीजण पैशांच्या बदल्यात एक दिवसासाठी आपली बायको ऑफर करत होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kerala

    पुढील बातम्या