मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /परभणी: शनिवारची रात्र ठरली काळरात्र; नवविवाहित जोडपं झोपेतून उठलंच नाही, हृदयद्रावक शेवट

परभणी: शनिवारची रात्र ठरली काळरात्र; नवविवाहित जोडपं झोपेतून उठलंच नाही, हृदयद्रावक शेवट

Suicide in Parbhani: परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित दाम्पत्याने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट (Couple commits suicide) केला आहे.

परभणी, 10 जानेवारी: परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या पूर्णा (Purna) तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित दाम्पत्याने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट (Couple commits suicide) केला आहे. शनिवारी रात्री त्यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली (Drink poison and commits suicide) आहे. रविवारी सकाळी दोघंही आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

गंगाधर विश्वनाथ चापके (वय-25) आणि सपना गंगाधर चापके (वय-21) असं मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे. ते पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील रहिवासी होते.  आठ महिन्यांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. पण काल सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येच्या कारणाचा शोध पूर्णा पोलीस घेत आहेत.

हेही वाचा-थरारक! मध्यरात्री रंगला खुनी खेळ; कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीला केलं रक्तबंबाळ मग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभर दोघंही पती पत्नी घरीच होते. पण रविवारी सकाळी दोघंही झोपेतून उठले नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याजवळ जाऊन पाहणी केली असता, दोघंही मृतावस्थेत आढळले आहेत. तसेच त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळली आहे.

हेही वाचा-थरारक! मध्यरात्री रंगला खुनी खेळ; कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीला केलं रक्तबंबाळ मग

संबंधित प्रकार उघडकीस येताच गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Parbhani, Suicide