अमेरिकेचे प्रसिद्ध कोरोना व्हायरस विशेषज्ज्ञ डॉ. एंथनी फाउची यांनी सांगितले की 2021 वर्षाच्या शेवटपर्यंत जीवन सर्वसामान्य होणार नसल्याची शक्यता आहे. फाउचीने सांगितले की, कोरोना व्हायरसची लस मदत करू शकेल, मात्र यातही काही अटी आहेत. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोरोनाच्या ज्या लसीवर काम होत आहे, त्यापैकी एकाला 2020 च्या शेवटपर्यंत वा 2021 ला मंजुरी मिळेल.
फाउचीचं म्हणणं आहे की, जरी लशीला या वर्षी वा पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत मंजुरी मिळेल. मात्र तरीही ही लस नागरिकांना तातडीने उपलब्ध करता येणार नाही. MSNBC सोबत दिलेल्या मुलाखतीत फाउचींनी सांगितले की, मंजुरी मिळाल्यानंतर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि सप्लाय करण्याची गरज आहे. 2021 च्या मध्याच्या शेवटपर्यंत लोकसंख्येच्या मोठ्या भागातील लोकांना लस देणं आणि त्यांना सुरक्षित करण्याचं काम पूर्ण होईल, असं दिसून येत नाही.
सांगितले जात आहे की ज्या कोरोना लशींवर सध्या काम सुरू आहे, त्यामध्ये अधिकतर फ्रीजरमध्ये थंड ठेवावे लागते. फाऊची म्हणाले की, वॅक्सीनच्या कोल्ड स्टोरेजबाबतदेखील समस्या निर्माण होत आहे. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी फोल्ड चैन तयार करावे लागेल.
फाउचींनी रेस्टॉरंट-बार आणि अन्य जागांवर लोकांची गर्दी जमा होण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, तरुणांना वाटतं की त्यांना गंभीर आजार होणार नाही. मात्र त्यांना हे विसरून चालणार नाही की त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. ते पुढे असंही म्हणाले की लोक कोरोनाबाबत गैरसमज पसरवीत आहे, त्यामुळेही अडचणी वाढत आहेत.
फाउची म्हणाले की त्यांना या गोष्टीचा फार त्रास होतो की कोणत्याही वैज्ञानिक पुरावा नसताना अनेक औषधांबाबत दावा केला जात आहे. त्यामुळे अशा दाव्यांवर तपास करीत त्याला फेटाळण्यात बराच वेळ वाया जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.