बंगळूरू, 08 जुलै : कर्नाटकातील 13 आमदारांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस – जेडीएसचं सरकार अल्पमतात आलं. या आमदारांच्या मनधरणीचा पूर्ण प्रयत्न काँग्रेस, जेडीएसनं केलं. पण, त्याला यश आलं नाही. मंत्रिपद, मतदारसंघाला जास्त निधी देण्याचं वचन देखील या आमदारांना दिलं गेलं. पण, त्यानंतर देखील आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या राजकीय उलथापालथीनंतर आता भाजपला टार्गेट केलं जात आहे. यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी कर्नाटकातील आमदार राहुल गांधी यांना फॉलो करत आहेत. त्यामुळे ते राजीनामा देत असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी दिला. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी भाजपचं 303 खासदारानं पोट भरलं नाही. त्यामुळे त्यांनी कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केलं असा आरोप देखील यावेळी केला. देशाच्या राजकारणात सध्या कर्नाटकातील राजकीय घडामोड केंद्रस्थानी आहे.
Defence Minister Rajnath Singh in Lok Sabha: Our party has nothing to do with what is happening in Karnataka. Our party has never indulged in horse trading. pic.twitter.com/EqdWlBnXi1
— ANI (@ANI) July 8, 2019
काँग्रेस-जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे, आमदाराच्या अपहरणाचा भाजपवर आरोप कर्नाटकात भाजपची सत्ता? 13 आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे आता भाजप सत्ता स्थापन करणार का? या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 2018मध्ये सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस – जेडीएसला सत्तेत येऊन 13 महिने झाले आहेत. तत्पूर्वी भाजपनं देखील सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. पण, केवळ अडीच दिवसांमध्ये बहुमत सिद्ध न करता आल्यानं भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसशी हातमिळवणी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. हा सारा प्रकार भाजपच्या जिव्हारी लागला होता. शिवाय, काँग्रेस - जेडीएसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं माजी मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी म्हटलं होतं. VIDEO: ‘दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी’, पाहा नयनरम्य रिंगण सोहळा