बंगळुरू 8 जुलै : कर्नाटकमधला राजकीय पेच आणखी चिघळलाय. बंड शांत करण्यासाठी काँग्रसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेस श्रेष्ठींनी आदेश दिल्याने सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. त्यानंतर जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत. आता बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना शांत करण्याचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. तर नाराज आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता दिसत नाहीये. आणखी एका नाराज आमदाराने राजीनामा दिल्याचंही वृत्त आहे. तर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आता कुठलंही संकट नसल्याचं स्पष्ट केलं. अडचण दूर झालीय, संकट टळलं आहे, सर्व काही आलबेल आहे असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं मात्र त्यांच्या चेहेऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. कुमारस्वामी यांची खुर्ची धोक्यात आली असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजप आमदारांचं अपहरण करत असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अपक्ष आमदार नागेश यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की भाजपचे नेते येदियुरप्पा यांच्या पीएने आपलं अपहरण केलं. नागेश यांना खास विमानाने अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी राजकीय पेच चिघळणार कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारवरील संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देखील देण्यात आली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यानंतर काँग्रेस- जेडीएसला आणखी एक धक्का बसला असून अपक्ष आमदार नागेश यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे देखील पाठवून दिला आहे. दरम्यान, सध्य स्थितीमध्ये सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस – जेडीएस आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकते. राजीनामा दिलेल्या 13 आमदारांना मंत्रिपदं आणि त्यांच्या मतदारसंघाकरता स्पेशल पॅकेज देण्याची तयारी दर्शवण्यात आली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं विकली जमीन ! कर्नाटकात भाजपची सत्ता? 13 आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे आता भाजप सत्ता स्थापन करणार का? या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 2018मध्ये सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस – जेडीएसला सत्तेत येऊन 13 महिने झाले आहेत. तत्पूर्वी भाजपनं देखील सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. पण, केवळ अडीच दिवसांमध्ये बहुमत सिद्ध न करता आल्यानं भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसशी हातमिळवणी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. हा सारा प्रकार भाजपच्या जिव्हारी लागला होता. शिवाय, काँग्रेस - जेडीएसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं माजी मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.