मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री!

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 24 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा हजर असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

(धनुष्यबाण कुणाचे? 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार अंतिम निर्णय?)

दुपारी चार ते पाच केंद्रीय गृह मंत्रालयात बैठक होणार आहे. नॉर्थ ब्लॉकमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

(मंत्रिमंडळ विस्ताराचा दिल्लीत निघणार तोडगा? शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला)

दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघातील कामे यावर चर्चा केली आहे. सोबतच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा करण्याची शक्यता आहे.

बैठक कशासाठी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे,कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित असणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील नवीन सहकारी कायदा, मल्टी स्टेट बँक आणि कारखान्यासंदर्भातील नवीन कायदा,साखर उद्याग,कापूस प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, इथेनॉल धोरण, मासेमारी, आजारी कारखाने आदी मुद्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: अमित शहा, एकनाथ शिंदे, दिल्ली, देवेंद्र फडणवीस