‘हे’ ऐतिहासिक शहर हादरलं; तासाभरात सापडले 5 बेवारस मृतदेह, होणार कोरोना चाचणी

‘हे’ ऐतिहासिक शहर हादरलं; तासाभरात सापडले 5 बेवारस मृतदेह, होणार कोरोना चाचणी

अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासन चिंतेत असून नेमकं कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठोस सांगता येणार नाही असं प्रशासनाने म्हटलं आहे.

  • Share this:

पानीपत 5 जुलै: देशभर कोरोनाची साथ असल्याने सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. असं वातावरण असतानाच हरियानातलं ऐतिहासिक शहर पानीपत शनिवारी हादरुन गेलं. पानीपतमध्ये तासाभरातच 5 बेवारस मृतदेह सापडले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं असून त्या सर्व मृतदेहांची आता कोरोना चाचणी होणार आहे.

पोलिसांना स्थानिक लोकांनी त्यांच्या भागात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ठराविक अंतराने अशाच प्रकारची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानंतर पोलिस स्थानिक सामाजिक संघटनांच्या मदतीने त्या सर्व मृतदेहांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असून त्यांची आता कोरोना चाचणी होणार आहे.

या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. यातले बहुसंख्य जण हे बेघर असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासन चिंतेत असून नेमकं कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठोस सांगता येणार नाही असं प्रशासनाने म्हटलं आहे. शहरात संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याने या घटनेने जास्तच चिंता निर्माण झाली आहे.

अनलॉक 2.0 मध्ये कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासांत रुग्णांनी मोडले सर्व रेकॉर्ड

शनिवारी एकाच दिवसात देशात तब्बल 23 हजार कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. तर महाराष्ट्रात सर्व रेकॉर्ड मोडले असून एकाचदिवसात तब्बल 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाच्या सर्व प्रयत्नानंतरही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' औषधाचा डोस

आता पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक साथींचे आजारही येत असतात. त्यात आता कोरोनाची भर पडल्याने आणखी धोका वाढला आहे. तो धोका लक्षात घेऊन देशातल्या अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनही करण्यात येत आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 5, 2020, 7:29 AM IST

ताज्या बातम्या