अनलॉक 2.0 मध्ये कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासांत रुग्णांनी मोडले सर्व रेकॉर्ड

अनलॉक 2.0 च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देण्यात येत आहेत. मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे.

अनलॉक 2.0 च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देण्यात येत आहेत. मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 04 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सरकार अनलॉक 2.0 च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देण्यात येत आहेत. मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा 20 हजारांच्या पुढे जात आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 6 लाख 48 हजार 315 झाली आहे. तर, 24 तासांत 442 जणांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा एकूण आकडा 18 हजार 655 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 35 हजार 433 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 3 लाख 94 हजार 227 रुग्ण निरोगी झाले आहेत. देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 6364 नवीन रुग्णांची नोंद झाली. हा एक दिवसातला सर्वाधिक आकडा आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 92 हजार 990 झाला आहे. तर, 24 तासांत 198 लोकांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा आकडा 8376 झाला आहे. इतर राज्यांची आकडेवारी दुसरीकडे देशात निरोगी रुग्णांची संख्याही वाढत आहे. दिल्लीत सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट 69.3% आहे. तर दुसरीकडे जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 10 लाख 37 हजार 625 झाला आहे. संपादन-प्रियांका गावडे.
    First published: