Home /News /national /

अटक केलेल्या दहशतवाद्याचा बापचं टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड, ट्रेनिंगसाठी दिले होते पैसे

अटक केलेल्या दहशतवाद्याचा बापचं टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड, ट्रेनिंगसाठी दिले होते पैसे

Pakistani Terror Module: ओसामा आणि जिशान असे होते की त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं.

  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: मंगळवारी दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली. त्यापैकी ओसामा आणि जिशान असे होते की त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. यूपी एटीएस (UP ATS) आणि दिल्ली पोलिसांना (Delhi Police) माहिती मिळाली की, हे दहशतवादी सणांदरम्यान मोठा हल्ला करण्याचा प्लान आखत होते. पण आता जेव्हा त्यांच्या अटकेनंतर तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. टेरर मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड एजन्सीजनुसार असं सांगितलं जात आहे की, या संपूर्ण घटनेचा खरा मास्टरमाईंड ओसामाचे वडील उसैदूर रहमान आहेत. ज्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ओसामाचे वडील सध्या दुबईमध्ये आहेत आणि तेथे जे मदरसा चालवतात ते थेट ISIच्या संपर्कात आहे. आता ओसामाच्या चौकशी दरम्यान, या संपूर्ण घटनेत त्याच्या वडिलांची भूमिका स्पष्ट झाली आहे. असे काही चॅटही सापडले आहेत, ज्याच्या आधारे ओसामाचे वडील मास्टरमाईंड म्हणून सांगितले जात आहेत. ISIच्या मदतीनं ओसामा पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी गेला होता. हेही वाचा- तपास यंत्रणा कामाला, मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल याशिवाय ओसामाचे काकाही या प्रकरणात आरोपी आहेत. असे म्हटलं जातं की, ओसामाचा काका हुमैदूर रहमान देखील या दहशतवादी मॉड्यूलचा एक भाग आहे. त्याचनं अटक करण्यात आलेल्या जिशानला कट्टरपंथी बनवले आणि त्याला ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला पाठवलं. असं सांगण्यात आलं आहे की, काका हुमैदूर रहमान यूपीमधील प्रयागराजचे रहिवासी आहे आणि सध्या तो फरार आहे. त्याच्या अटकेसाठी एजन्सी सक्रिय झाल्या आहेत. थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग अटक करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी या दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानातील थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. फिदाईन हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले होते, लोकांना ओलीस ठेवण्याचे ट्रेनिंग तसेच एकाच वेळे अनेक ठिकाणी कसे हल्ले करायचे याचे ट्रेनिंग दिले गेलं आहे. याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब यानंही ट्रेनिंग घेतली होती. हेही वाचा- ATS चा मोठा खुलासा; Mumbai मध्ये राहणारा जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात
   मुंबईतून फंडिंग
  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिग करण्यात आलं होतं. हा पैसा हवालामार्फत पुरवला गेला होता. जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगडीयांच्या संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे, दहशतवादी कृत्याकरता लागणा-या सामग्री करता पैसे देणे याकरता हा या पैशांचा वापर केला जायचा. यामुळे आता मुंबई आणि दिल्ली येथील अंगडीया दहशतवाद विरोधी पथकाच्या रडारवर आहेत.

   6 दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंड जान शेखला मुंबईच्या सायनमधून अटक, दाऊदच्या होता संपर्कात!

  दिल्लीतील 3 तर मुंबईतील दोन ठिकाणे टार्गेटवर अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर दिल्लीतील राजकीय कार्यालये तसच संसद भवन सारखी महत्वाची कार्यालये टार्गेटवर होती असा संशय तपास यंत्रणांना आहे. मुंबईतील दादर, बांद्रा, प्रभादेवी, याच सोबत दक्षिण मुंबईतील अनेक भागांची रेकी दहशतवादी करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेकी करण्यापूर्वीच दिल्ली स्पेशल सेलने दहशतवाद्यांचा कट उधळला आणि मुसक्या आवळल्या.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Terrorist, Terrorist attack

  पुढील बातम्या