मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ATS चा मोठा खुलासा; Mumbai मध्ये राहणारा जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात

ATS चा मोठा खुलासा; Mumbai मध्ये राहणारा जान मोहम्मद 20 वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात

दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई, 15 सप्टेंबर : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) पत्रकार परिषद घेत अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद (Jan Mohammad) याच्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान महोम्मद याच्या बाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असून त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे. मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे.

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

दिल्लीला जाताना राजस्थानमध्ये अटक

9 सप्टेंबरला दिल्लीला जाण्याची योजना जान मोहम्मद याने ठरवली आणि त्यासाठी 13 तारखेचं त्याला ट्रेनचं तिकीट मिळालं. ट्रेनने मुंबईहून दिल्लीला जात असताना राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मद शेख याला अटक केली. अटक केली त्यावेळी जान महोम्मद याच्याकडे शस्त्रसाठा सापडला नाही असंही एटीएस प्रमुखांनी सांगितलं.

एटीएसची टीम दिल्लीला जाणार

जान मोहम्मद शेख याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम आज संध्याकाळी मुंबईतून दिल्लीसाठी रवाना होणार आहे. जान मोहम्मद याच्या संदर्भातील आमच्याकडे असलेली माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात येईल आणि दिल्ली पोलिसांकडे असलेली माहिती आमम्ही घेऊ असंही एटीएसने सांगितलं.

Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग, तपासात माहिती उघड

जानच्या हालचालींवर अनेक दिवसांपासून एटीएसचं लक्ष होतं. जान मोहम्मद गेल्या अेक दिवसांपासून आमच्या रडारवर होता. पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये जान विरोधात 20 वर्षांपूर्वीची केस आहे. या प्रकरणात एटीएसचं अपयश नाहीये. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी कारवाईसाठी एटीएसला पूर्ण मोकळीक दिली आहे.

जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.

दिल्ली पोलिसांनी कारवाई केली त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती. कारवाई झाल्यावर आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आता दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस आम्ही दोन्ही एकत्र मिळून कारवाई करणार आहोत असंही एटीएसने सांगितलं आहे.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai