मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई हायअलर्टवर; तपास यंत्रणा कामाला, लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी उभारणार नवं मॉडल

मुंबई हायअलर्टवर; तपास यंत्रणा कामाला, लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी उभारणार नवं मॉडल

मुंबई (mumbai) आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका (Elections in Uttar Pradesh) दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली.

  मुंबई, 16 सप्टेंबर: नवी दिल्लीत(delhi) सहा दहशतवाद्यांना अटक (6 terrorists arrested in Delhi) केली आहे. या दहशतवादांच्या मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई (mumbai) आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका (Elections in Uttar Pradesh) दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली. या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख (Jan Mohammad shaikh) याला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन (sion) भागात राहणारा आहे. यानंतर सर्वच तपास यंत्रणा अलर्टवर आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करुन दिल्लीला जात असल्यानं मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. बुधवारी या पार्श्वभूमीवर आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली.

  Time Magazine च्या 100 'सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या' यादीत पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी आणि अदर पूनावाला

   या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत अॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेवरही चर्चा झाली आहे. मुख्य म्हणजे या बैठकीत लोकलच्या सुरक्षेबाबत एक नवीन मॉडेल तयार करण्यात येणार आहे. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
  जान मोहम्मद आणि त्याचा साथीदार गोल्डन टेंपल या ट्रेननं प्रवास करुन दिल्लीला जात होते. तपास यंत्रणांनी त्यांना ट्रेनमध्येच पकडलं. मात्र त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आलं नाही. या कारवाईनंतर राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. सर्व यंत्रणांकडून काम सुरु आहे. दहशतवादांकडून मुंबई लोकलची रेखी दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचं ठरवण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्याक येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

  Explainer : नेमका कसा होणार कोरोना महासाथीचा अंत?

  सध्या मुंबई लोकल आणि स्थानकांवर बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल. तसंच ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल,असं जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितलं. दहशतवादांकडून अनेक ठिकाणांची रेकी गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी मुंबईतून एका जणाला अटक करण्यात आली होती. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपीमध्ये IED ब्लास्ट करण्याचा कट होता. धक्कादायक म्हणजे या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलचीही रेकी केली होती. तसंच घातपात घडवण्यासाठी त्यांनी राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन रेकी केल्याचंही समजतंय.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Mumbai local, Mumbai police, Terrorist attack

  पुढील बातम्या